बसपा गटनेत्याला बाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:12 IST2021-09-09T04:12:57+5:302021-09-09T04:12:57+5:30

दुर्बल घटक निधीत ७० कोटींचा घोळ असल्याचा आरोप बसपाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी केला. महापौर यावर निर्णय देत असताना ...

BSP expelled the group leader | बसपा गटनेत्याला बाहेर काढले

बसपा गटनेत्याला बाहेर काढले

दुर्बल घटक निधीत ७० कोटींचा घोळ असल्याचा आरोप बसपाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी केला. महापौर यावर निर्णय देत असताना तांत्रिक अडचणीमुळे घोडेस्वार बोलतच होते. यामुळे नाराज महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, सभागृहाचे निर्देश ऐकत नसाल तर तुमचे ऐकण्यासाठी सभागृहात रिकामा नाही. यावर संतप्त घोडेस्वार थेट सभाकक्षात पोहोचले. महापौरांनी त्यांना बाहेर काढण्याचे निर्देश दिले. यामुळे नाराज घोडेस्वार व बसपाचे इब्राहिम मोहमद यांनी सभागृहाबाहेर महापौरांच्या विरोधात नारेबाजी करून निषेध व्यक्त केला.

...

दटके म्हणाले तर प्रश्न परत घेतो

मागील पाच वर्षांत जाहिरात एजन्सीने किती शुल्क जमा केले, जागेचे भाडे व हप्ते का भरणा केला नाही, असा प्रश्न आमदार व नगरसेवक प्रवीण दटके यांनी उपस्थित केला. उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी उत्तराला सुरुवात करताच दटके यांनी नाराजी व्यक्त केली. जाहिरात विभागही आपल्याकडेच आहे का? असा प्रश्न केला. तुमच्याकडे असेल तर मी प्रश्न मागे घेतो. तसेही मालमत्ता विभागात अनियमितता आहे. त्यात योग्य उत्तराची अपेक्षा नाही.

...

Web Title: BSP expelled the group leader