Maharashtra Assembly Election 2019 : बसपाचे उमेदवार थेट नामांकन अर्जच भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:32 PM2019-10-02T22:32:33+5:302019-10-02T22:33:24+5:30

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. तेव्हा बसपाचे उमेदवार आता थेट उमेदवारी अर्जच भरतील, अशी माहिती आहे.

BSP candidates will fill the nomination form directly | Maharashtra Assembly Election 2019 : बसपाचे उमेदवार थेट नामांकन अर्जच भरणार

Maharashtra Assembly Election 2019 : बसपाचे उमेदवार थेट नामांकन अर्जच भरणार

googlenewsNext
ठळक मुद्देउमेदवारांची यादी जाहीर होणार नाही 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस व भाजपचे उमेदवार झाले आहे. वंचित बहुजन आघाडीनेही आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. परंतु बसपाचे उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. तेव्हा बसपाचे उमेदवार आता थेट उमेदवारी अर्जच भरतील, अशी माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीत बसपाला राज्यात अजूनपर्यंत खाते उघडता आलेले नाही. परंतु बसपाची ताकद मात्र बऱ्यापैकी निर्माण झालेली आहे. राज्यात बसपा हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष मानला जातो. निवडणुकीतील विजयाचे गणित बदलण्याची ताकद बसपामध्ये आहे. यंदा वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा असेच चित्र निर्माण केले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे उमेदवार कोण याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले होते. वंचित बहुजन आघाडीचे बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. परंतु बसपाचे उमेदवार कोण याचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे.
आजवरचा इतिहास पाहता काँग्रेस व भाजपमधील असंतुष्ट किंवा तिकीट नाकारण्यात आलेले उमेदवार हे बसपाचे तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत आले आहेत. अशा असंतुष्ट नेत्यांच्या प्रतीक्षेत बसपा उमेदवारांची यादी ही दरवेळी शेवटच्या क्षणी जाहीर होत असते. अनेकदा उमेदवारांची घोषणा न करता थेट एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरायला लावण्याचाही प्रकार झालेला आहे. यावेळीही तीच परिस्थिती दिसून येत आहे.

यादी नव्हे थेट अर्जच भरणार
बसपातर्फे उमेदवारांची निवड झाली आहे. यावेळी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार नाही. पक्षाचा एबी फॉर्म वाटप करण्याची प्रकिया सुरु आहे. त्यामुळे बसपाचे उमेदवार थेट उमेदवारी अर्ज जाहीर करतील.
सुरेश साखरे
प्रदेशाध्यक्ष, बसपा

Web Title: BSP candidates will fill the nomination form directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.