तपकिरी महाराज पालखी सोहळा परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST2021-04-06T04:09:15+5:302021-04-06T04:09:15+5:30
बाजारगाव : शिवा (सावंगा) येथे दरवर्षी तपकिरी महाराज पालखी सोहळ्याचे आयाेजन केले जाते. यावर्षी काेराेना संक्रमणामुळे हा साेहळा रद्द ...

तपकिरी महाराज पालखी सोहळा परंपरा खंडित
बाजारगाव : शिवा (सावंगा) येथे दरवर्षी तपकिरी महाराज पालखी सोहळ्याचे आयाेजन केले जाते. यावर्षी काेराेना संक्रमणामुळे हा साेहळा रद्द करण्यात आल्याने ही पंरपरा खंडित झाली आहे, अशी माहिती तपकिरी महाराज देवस्थानचे विश्वस्त नाना देशमुख यांनी दिली.
हा साेहळा श्री संत तुकाराम महाराज बीजदिनी सुरू हाेताे. सात दिवस विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम व भाेजनदान आयाेजित केले जाते. याच कार्यक्रमादरम्यान पालखी साेहळ्याचेही आयाेजन केले जाते. साेबतच गोपालपुरी देवस्थानात महाप्रसादाचे आयाेजन केले जाते. सावंगा हे तपकिरी महाराजांचे जन्मगाव असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमात शिवा, सावंगा, डिगडोह, बाजारगाव, पांजरा, चिंचोली (पठार), मसाळा यासह येथील पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी हाेतात. काेराेना संक्रमणामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कार्यक्रमातील गर्दी काेराेनाच्या पथ्यावर पडू नये म्हणून यावर्षी पालखी साेहळा रद्द करण्यात आल्याची माहिती नाना देशमुख यांनी दिली. त्याऐवजी छाेटेखानी कार्यक्रमाचे आयाेजन करून दहीकाल्याचे वितरण करण्यात आले. या कार्यकमाला सरपंच प्रवीण पानपत्ते, नाना देशमुख, दिगांबर उईके, विनोद देशमुख, सुरेश कोहळे, गंगाधर राऊत, उपासराव सिरसाम, मंगेश कोहळे, विनायक कोहळे, नामदेव राजूरकर यांच्यासह एकूण २५ भाविक उपस्थित हाेते.