शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लग्नापूर्वीच नवरदेव झाला गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:41 IST

अनेक वर्षांपर्यंत प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा नवरा मुलगा ऐन लग्नाच्या एक दिवसापूर्वीच प्रेयसीला धोका देऊन गायब झाला. रविवारी लग्नाच्या ठरलेल्या मुहूर्तावर लग्नमंडपात नवरदेव न पोहोचल्याने दुखावलेली नवरी परिवारासह सक्करदरा पोलीस ठाण्यात पोहोचली.

ठळक मुद्देनवरी पोहोचली ठाण्यात : अत्याचार, मारहाण व फसवणुकीचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक वर्षांपर्यंत प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा नवरा मुलगा ऐन लग्नाच्या एक दिवसापूर्वीच प्रेयसीला धोका देऊन गायब झाला. रविवारी लग्नाच्या ठरलेल्या मुहूर्तावर लग्नमंडपात नवरदेव न पोहोचल्याने दुखावलेली नवरी परिवारासह सक्करदरा पोलीस ठाण्यात पोहोचली.फिर्यादी नवरी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार नवरा मुलगा लग्नासाठी तयार होता. परंतु त्याची आई आणि बहिणींचा विरोध होता. त्यामुळेच लग्न तुटण्याची वेळ आली. प्रवीण शिवचरण शामकुंवर (मुलगा), सुशीलाबाई शिवचरण शामकु वर (आई) आणि बहीण प्रणिता नितीन साळवे, अमिता बहादुरे, अनिता मेश्राम रा. भांडेप्लॉट, सेवादलनगर अशी आरोपींची नावे आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण एका फार्मा कंपनीत एमआर आहे. २७ वर्षीय युवती एका खासगी कंपनीत नोकरी करते. प्रवीण हा नात्यातच लागत असल्याने ते एकमेकांना ओळखतात. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंधही निर्माण झाले. असा आरोप आहे की, गेल्या सहा वर्षांपासून प्रवीण लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. त्यांचे लग्न लांबणीवर पडत होते. आईनेही लग्नाला विरोध सुरू केला होता. अखेर रविवारी सकाळी १०.३० वाजता युवती व प्रवीणचे लग्न ठरले. मुलीच्या घरी लग्न होणार होते. शनिवारी रात्री १० वाजता हळद लावण्यासाठी प्रवीणला फोन करून बोलावण्यात आले. तेव्हा त्याने नकार दिला. थेट लग्नात पोहचेल असे सांगितले. परंतु तो आलाच नाही. अजनी येथील मुलीच्या घरी लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. रविवारी सकाळी १०.३० वाजता नातेवाईक आणि पाहुणेही पोहचले होते. परंतु नवरदेवाकडील कुणी आले नाही. प्रवीणचा मोबाईलही बंद येत होता. मुलीकडील काही नातेवाईक मुलाला आणण्यासाठी त्याच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी सांगितले की, प्रवीण रात्रीपासूनच गायब आहे. मुलीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी अत्याचार, मारहाण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

टॅग्स :marriageलग्नCrimeगुन्हा