शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

दोन वर्षांपासून मेयोमध्ये सक्रिय होता लाचखोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 21:00 IST

नोकरी लावून देण्यासाठी (डीन) अधिष्ठात्यांच्या नावावर आठ लाख रुपयाची लाच मागणारा जावेद पठाण गेल्या दोन वर्षांपासून मेयो रुग्णालयात सक्रिय होता.

ठळक मुद्देसुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह : दोन दिवसाची कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकरी लावून देण्यासाठी (डीन) अधिष्ठात्यांच्या नावावर आठ लाख रुपयाची लाच मागणारा जावेद पठाण गेल्या दोन वर्षांपासून मेयो रुग्णालयात सक्रिय होता. यादरम्यान नोकरी लावून देणे, उपचारासाठी आवश्यक दस्तावेज बनवून देणे आदींच्या नावावर त्याने लोकांची फसवणूक केली. रुग्णालयातील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांपर्यंत यातील एकही घटना पोहोचली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.एसीबीने मंगळवारी सायंकाळी जावेद पठाण याला एका ऑटोचालकाकडून २० हजार रुपयाची लाच घेताना पकडले. प्रवाशांना मेयो रुग्णालयात सोडल्यानंतर ऑटोचालकाची जावेदसोबत ओळख झाली होती. तेव्हा त्याने आपली ओळख मेयोमध्ये तंत्रज्ञ असल्याची सांगितली होती. त्याने ऑटोचालकाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. रुग्णालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया आणि सहारे बाबू यांच्याशी आपली ओळख असल्याचे आणि त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार त्याच्याच माध्यमातून होत असल्याचा दावाही त्याने केला होता. जावेदने ऑटोचालकाला डीनच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. या मोबदल्याला त्याला आठ लाखाची लाच मागितली. पहिली किस्त म्हणून ५० हजार रुपये देण्यास सांगितले. ऑटोचालकाने एसीबीकडे तक्रार केली. याआधारावर एसीबीने जावेदला पकडण्याची योजना आखली. त्यांनी मंगळवारी सायंकाळी पठाणला २० हजार रुपये घेताना पकडण्यात आले. पकडल्या गेल्यानंतर जावेद हा स्वत:च्या भरवशावर लाच मागितल्याचे सांगत आहे. यात दुसऱ्या कुणाचीही भूमिका नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. प्रकरण गंभीर असल्याने एसीबी याची सखोल चौकशी करीत आहे.या प्रकरणामुळे मेयो रुग्णालयातील अराजकताही उघडकीस आली आहे. येथे जवळपास १५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे त्यांना असामाजिक तत्त्वांना रुग्णालयात प्रवेशापासून रोखण्याचे आदेशही मिळालेले आहेत. यानंतरही जावेद दोन वर्षांपासून रुग्णालय परिसरात कसा काय सक्रिय होता. जावेदप्रमाणेच मेयो रुग्णालयात अनेक दलाल सक्रिय आहेत. ते रुग्णांकडून उपचारासाठी किंवा त्यासाठी लागणारे आवश्यक दस्तावेज बनवून देण्याच्या नावावर फसवणूक करतात. त्यांना रुग्णालय परिसरात फिरताना सहजपणे पाहता येते. जावेदने ऑटोचालकाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी खोटे दावे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यानला जावेदला न्यायालयासमोर सादर करून दोन दिवसाची कोठडी घेण्यात आली आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग