शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भू-संपादन विभागातील लाचखोर लिपिक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:26 IST

प्रकल्पग्रस्त शेतमजुराला भूसंपादनाच्या अतिरिक्त मोबदल्याच्या बदल्यात ७ हजारांची लाच मागणाऱ्या एका लाचखोराला एसीबीने जेरबंद केले.

ठळक मुद्देअतिरिक्त मोबदल्यात मागितले सात हजार : एसीबीकडून ‘डिमांड’चा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रकल्पग्रस्त शेतमजुराला भूसंपादनाच्या अतिरिक्त मोबदल्याच्या बदल्यात ७ हजारांची लाच मागणाऱ्या एका लाचखोराला एसीबीने जेरबंद केले. दिलीप शंकरराव खेडकर (वय ५३) असे आरोपीचे नाव आहे. तो भू-संपादन विभागात कनिष्ठ लिपिक आहे.तक्रारदार व्यक्ती कुही तालुक्यातील जीवनापूरचे रहिवासी होय. ते मोलमजुरी करतात. त्यांच्या आईच्या नावाने गावात ६ एकर शेत आणि घर होते. गोसेखुर्द प्रकल्पात ते गेले. ज्यावेळी भूसंपादन प्रक्रिया झाली त्यावेळी तक्रारदार यांची मुले अन् अन्य वारसदार छोटी (अल्पवयीन) होती. त्यामुळे वारसदारांची नावे कमी दिली गेली होती. आठ वर्षांपूर्वी तक्रारदारांच्या आईचा मृत्यू झाला आणि वारसदार आता सज्ञान झाले. त्यामुळे वाढीव मोबदल्याचा दावा सरकारकडून मंजूर झाला. त्यामुळे तक्रारदाराला वाढीव कुटुंबातील सदस्यांचा अतिरिक्त मोबदला म्हणून २ लाख ९० हजार रुपये मिळणार होते. या रकमेच्या बदल्यात आरोपी खेडकरने तक्रारदाराला १० हजारांची लाच मागितली होती. ही रक्कम द्यायची ईच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी लाचखोर खेडकरसोबत बोलण्यास सांगितले. यावेळी तक्रारदाराने लाचखोर खेडकरशी सौदेबाजी केली. पंचासमोर खेडकरने १० ऐवजी ७ हजारांची लाच पाहिजे म्हणून मागणी केली. त्याचे तक्रारदाराने रेकॉर्डिंग केले. ठरल्याप्रमाणे खेडकरने ही लाचेची रक्कम घेऊन तक्रारदाराला बोलविले. दुसरीकडे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारदाराला पावडर लावलेल्या नोटा देऊन पाठविले. मात्र आरोपी कार्यालयातून निघून गेला. तो रक्कम घेण्यास टाळाटाळ करू लागल्यामुळे खेडकरविरुध्द पोलिसांनी लाचेची मागण्याचा गुन्हा सदर पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल केला.अटक अन् घरझडतीहीआरोपीला सोमवारी लाच मागण्याच्या आरोपात एसीबीने अटक केली. त्याच्या गोपाळनगरातील घरी झडतीही घेण्यात आली. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा कार्यालयाचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, नायक सचिन हलमवारे, सुशील हुकरे, कुणाल कढव, दिनेश धार्मिक आदींनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरण