शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलीस अधिकारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:08 IST

रेतीची अवैध वाहतुकीची कारवाई टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास (एएसआय) लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे तो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा ‘रायटर’ आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास रामटेक शहरातील तहसील कार्यालयासमोर करण्यात आली.

ठळक मुद्दे‘एसीबी’ची रामटेक येथे कारवाई : रेती वाहतुकीची कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (रामटेक/महादुला) : रेतीची अवैध वाहतुकीची कारवाई टाळण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास (एएसआय) लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे तो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा ‘रायटर’ आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास रामटेक शहरातील तहसील कार्यालयासमोर करण्यात आली.हरिश्चंद्र ब्रह्मनोटे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर ‘एएसआय’चे व राजू अवझे असे त्याच्या अटकेतील वाहनचालकाचे नाव असून, तो उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलूरकर यांच्या कार्यालयात ‘रायटर’पदी नोकरीला आहे. सीताराम मधुकर निंबोने (४९, रा. मनसर, ता. रामटेक) हे शेतकरी असून, त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे. त्यांनी अधूनमधून रेतीची वाहतूकही केली. याबाबत माहिती मिळताच हरिश्चंद्र ब्रह्मनोटे याने त्यांना कारवाई करण्याची धमकी दिली, शिवाय कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने ब्रह्मनोटे याने निंबोने यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. निंबोने यांनी होकार देताच त्याने ३२ हजार ५०० रुपयांची मागणी केली. शेवटी हा सौदा २५ हजार रुपयांवर आला आणि ही रक्कम सोमवारी (दि. १५) दुपारी देण्याचा निर्णय झाला.दरम्यान, सीताराम निंबोने यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली. ठरल्याप्रमाणे निंबोने यांनी ब्रह्मनोटेला रक्कम देण्यासाठी रामटेक येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात बोलावले. दुपारी २ वाजताच्या सुमारास सदर रक्कम स्वीकारत असताना दबा धरून असलेल्या ‘एसीबी’च्या कर्मचाºयांनी त्याला व त्याचा वाहनचालक राजू अवझे याला रंगेहात पकडून अटक केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.ही कारवाई ‘एसीबी’चे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनात ‘एसीबी’चे पोलीस उपनिरीक्षक शंकर शेळके, हवालदार प्रवीण पडोळे, लक्ष्मण परतेती, सरोज बुधे, पसरराम साई यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक