शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

वॉरंट न काढण्यासाठी मागितली लाच : विधि व न्याय विभागाच्या चपराशास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:45 IST

लाच न दिल्यास न्यायालयातून वॉरंट काढण्याची धमकी देणाऱ्या विधि व न्याय विभागाचा चपराशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या जाळ्यात अडकला. एसीबीने त्याला चार हजार रुपयाची लाच घेताना पकडले.

ठळक मुद्देएसीबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाच न दिल्यास न्यायालयातून वॉरंट काढण्याची धमकी देणाऱ्या विधि व न्याय विभागाचा चपराशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या जाळ्यात अडकला. एसीबीने त्याला चार हजार रुपयाची लाच घेताना पकडले. या कारवाईमुळे विधी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अब्दुल सलीम अब्दुल जब्बार (४५) असे आरोपीचे नाव आहे.सलीम जिल्हा न्यायालय परिसरातील विधी व न्याय विभागाच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे चपराशी आहे. तो पूर्वी कामठीतील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात कार्यरत होता. तक्रारकर्ता भंडारा येथील खातरोड येथील रहिवासी आहे. तो कॉम्प्युटर मेकॅनिक आहे. २०१३ मध्ये त्याचे लग्न झाले होते. पत्नीने त्याच्यासह सासू-सासऱ्याविरुद्ध कामठी पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी कामठीतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. तिथे तारखेवर जात असताना सलीमसोबत तक्रारकर्त्यांची ओळख झाली. सलीमने त्याला न्यायालयाशी संबंधित कुठलेही काम किंवा प्रकरण आपसी समझोत्याने सोडवून देत असल्याचे सांगितले. यानंतर तक्रारकर्त्यासह न्यायालयाकडून कुठलेही समन्स आले नाही. यामुळे तक्रारकर्ता निश्चिंत झाला. सात-आठ महिन्यांपूर्वी अचानक सलीमचे फोन येऊ लागले. तो तक्रारकर्त्यास चार हजार रुपयाची मागणी करू लागला. पैसे न दिल्यास आईवडील व त्याच्याविरुद्ध वॉरंट काढण्याची धमकी देऊ लागला. न्यायालयातील बाबूला सांगून कुठल्याही क्षणी वॉरंट काढेल, अशी धमकीही त्याने दिली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची भेट घेतली. त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. एसीबीने प्राथमिक चौकशी केली असता तक्रार खरी असल्याचे आढळून आले. या आधारावर एसीबीने सलीमला पकडण्याची योजना आखली. सलीमने तक्रारकर्त्यास पैसे घेऊन छत्रपती चौकात बोलावले. एसीबीने तिथे सापळा रचला. तिथे चार हजार रुपये घेताना त्याला पकडले.एसीबीने त्याच्या घराचीही झडती घेतली. या कारवाईमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली. सलीमची कामठीतून जिल्हा न्यायालयात बदली झाली आहे. यामुळे त्याचे तकारकर्त्याच्या प्रकरणाशी काहीही संबंध येत नाही. आरोपीने यापूर्वीही बरीच वसुली केल्याचा संशय आहे. यामुळे बदली झाल्यानंतरही तो तक्रारकर्त्यास त्रास देत होता. ही कारवाई एसीबी अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक संदीप जगताप, निरीक्षक गोरख कुंभार, हवालदार सुवील कळंबे, रविकांत डहाट, लक्ष्मण परतेकी आणि वकील शेख यांनी केली.शासकीय अधिकारी-कर्मचारी हादरलेएसीबीने गेल्या दोन दिवसात शासकीय कार्यालयात दोन कारवाई केल्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी हादरले आहेत. एसीबी अधीक्षकाचा पदभार सांभाळल्यानंतर रश्मी नांदेडकर यांनी एसीबीचा कारभार पारदर्शक करण्यावर भर दिला होता. त्यांच्या नियुक्तीपूर्वी ‘एसीबी’ मी टू प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेत आले होते. यामुळे पहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांकडे एसीबीचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCourtन्यायालय