लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेमप्रकरणात तेढ निर्माण झाल्याने त्याबाबत चर्चा करायला गेलेल्या प्रियकर-प्रेयसीत वाद झाला. त्यामुळे प्रियकराने प्रेयसीला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकरणाची प्रेयसीने सरळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून आरोपी विशाल भीमराव मेंढे (वय ३४, रा. चंद्रिकापुरे लेआऊट) याला अटक केली.विशाल आणि तक्रार करणाऱ्या ३४ वर्षीय महिलेत गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्यात अलीकडे विसंवाद वाढला. वाद झाल्याने त्यांच्या एका मध्यस्थ मैत्रिणीने या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी त्यांना चर्चेसाठी तयार केले. ठरल्याप्रमाणे विशाल, त्याची प्रेयसी आणि मैत्रीण हे तिघे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणारा पंपहाऊसजवळ पोहचले. तेथे त्यांची चर्चा सुरू झाली, मात्र वाद मिटण्याऐवजी वाढला. परिणामी विशालने तिला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्याशी लज्जास्पद वर्तनही केले. त्यामुळे महिला सरळ पोलिसांकडे पोहचली. तिने नोंदविलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी विशालला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
प्रेमप्रकरणात तेढ, प्रियकराची प्रेयसीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:57 IST
मप्रकरणात तेढ निर्माण झाल्याने त्याबाबत चर्चा करायला गेलेल्या प्रियकर-प्रेयसीत वाद झाला. त्यामुळे प्रियकराने प्रेयसीला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकरणाची प्रेयसीने सरळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
प्रेमप्रकरणात तेढ, प्रियकराची प्रेयसीला मारहाण
ठळक मुद्देकोराडीत गुन्हा दाखल : आरोपी गजाआड