लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चालू खरीप हंगामात महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाचे पेरणीक्षेत्र घटल्याचे तसे काही राज्यांमध्ये हे क्षेत्र थोडे वाढले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशात कापसाचे पेरणीक्षेत्र ३.३५ टक्क्यांनी, तर महाराष्ट्रात ६.१२ टक्क्यांनी घटले आहे. इतर पिकांच्या तुलनेत कापसाचा उत्पादन खर्च अधिक असून, कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी एरंडी, सोयाबीन, मका व तेलबियांना प्राधान्य दिले आहे.
देशातील एकूण कापूस उत्पादन आणि पेरणीक्षेत्र यात महाराष्ट्राचा वाटा एकतृतीयांश आहे. देशात कापसाचे सरासरी पेरणीक्षेत्र १२५ लाख हेक्टर, तर महाराष्ट्रात ४५ लाख हेक्टर आहे. मात्र, कापसाचे दर कायम दबावात राहत असल्याने, तसेच वाढता उत्पादन खर्च आणि घटती उत्पादकता व उत्पादन, यामुळे बहुतांश शेतकरी कापसाला पर्याय म्हणून इतर पिके घेत आहेत. गुजरातमध्ये एरंडी, भुईमूग, कुलथी व तीळ, तर मध्य प्रदेश व महाराष्ट्रात मूग, मका व सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे.
देशात एरंडीचे पेरणी क्षेत्र ६३.२० टक्क्यांनी वाढले असून, मूग १६.०८ टक्के, धान १३.४० टक्के, कुलथी १३.२४ टक्के, मका ८.४४ टक्के, तीळ ४.२८ टक्के, तर भुईमुगाचे पेरणी क्षेत्र एक टक्क्याने वाढले आहे. नायजर सीडचे पेरणी क्षेत्र ८७.१७ टक्क्यांनी घटले असून, रागी २२.७५ टक्के, तूर ८.१५ टक्के, उडीद ६.७५ टक्के व सूर्यफुलाचे पेरणीक्षेत्र ५.२४ टक्क्यांनी घटले आहे.
आयात व परावलंबित्व वाढणारपेरणी क्षेत्र घटल्याने त्या शेतमालाचे उत्पादन घटणार आहे. शेतमालाचा वापर व मागणी यातील तूट भरून काढण्यासाठी आयात केली जाणार आणि पुन्हा दर दबावात येणार. सरकारच्या शेतमाल बाजारातील अवाजवी हस्तक्षेपामुळे समाधानकारक दर मिळाले नाहीत, तर पुन्हा पेरणी क्षेत्र व उत्पादन कमी होऊन आयात वाढणार. या दुष्टचक्रामुळे आयातीसोबतच देशाचे परावलंबित्व वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केली.
कापसाचे राज्यनिहाय पेरणी क्षेत्र (लाख हेक्टर)राज्य सन २०२४-२५ २०२५-२६ घट/वाढपंजाब १,००० १.२०० २० टक्के वाढहरयाणा ४.७५० ४,००० १५.७९ टक्के घटराजस्थान ५.७५० ६.४०० ११.३० टक्के वाढगुजरात २३.१५२ २०.१६८ १२.८९ टक्के घटमहाराष्ट्र ४०.४९२ ३८.०१४ ६.१२ टक्के घटमध्य प्रदेश ५.८६३ ४.९७३ १५.१८ टक्के घटतेलंगणा १६.४५८ १७.५१८ ६.४४ टक्के वाढआंध्र प्रदेश १.८६० २.४२० ३०.११ टक्के वाढकर्नाटक ६.४०५ ७.४९९ १७.०८ टक्के वाढ