मांढळ-नवेगाव (देवी) मार्गावरील पुलाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST2021-07-28T04:09:13+5:302021-07-28T04:09:13+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : मांढळ ते नवेगाव (देवी) मार्गावर असलेल्या पुलाला भगदाड पडले आहे. ते भगदाड अपघातास कारणीभूत ...

Break the bridge on Mandhal-Navegaon (Devi) road | मांढळ-नवेगाव (देवी) मार्गावरील पुलाला भगदाड

मांढळ-नवेगाव (देवी) मार्गावरील पुलाला भगदाड

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : मांढळ ते नवेगाव (देवी) मार्गावर असलेल्या पुलाला भगदाड पडले आहे. ते भगदाड अपघातास कारणीभूत ठरत असल्याने तातडीने बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली. मात्र, स्थानिक लाेकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे.

दीड किमीचा हा मार्ग मार्ग पूर्णपणे खड्डेमय आहे. त्यामुळे नवेगाव (देवी), माजरी, खेंडा, टाकळी, कुजबा या गावांमधील शेतकऱ्यांसह नागरिकांना या राेडवरून प्रवास करताना राेज त्रास सहन करावा लागताे. त्यातच या मार्गावरील पुलाला भगदाड पडले. ते बुजवण्यासाठी नागरिकांनी लाेकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना २० दिवसांपूर्वी विनंती केली हाेती. लाेकप्रतिनिधींनी भगदाड बुजविण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र, याबाबत बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पराग ठमके असंबद्ध उत्तरे देत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

या परिसरातील नागरिक याच राेडने मांढळ येथील बाजारपेठेत खरेदी विक्री करण्यासाठी तसेच शासकीय, बॅंकिंग, उपचार व इतर कामांसाठी मांढळ (ता. कुही)ला येतात. त्यांना त्यांच्या गावापासून तर मांढळपर्यंतचा प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागताे. खड्डे व चिखलामुळे या राेडवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या राेडसाेबतच त्या भगदाडाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

...

नवीन पूल कुचकामी

या मार्गावर भगदाड पडलेल्या पुलापासून १०० फूट अंतरावर मागील वर्षी नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्या पुलाखालून पुराचे पाणी जात नसल्याने ते राेडवर तुंबून राहते. त्यामुळे नागरिकांना दीड ते दाेन फूट पाण्यातून मार्ग काढावा लागताे. सतत पाणी साचून राहात असल्याने राेडही खराब हाेत आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

Web Title: Break the bridge on Mandhal-Navegaon (Devi) road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.