शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नागपुरात वधुपित्याच्या घरी धाडसी चोरी : सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:45 IST

मुलीच्या लग्नासाठी घरात आणून ठेवलेली सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. शंकरनगर पार्कजवळ राहणारे गोपीनाथन शिवशंकर नायर (वय ५८) यांच्या निवासस्थानी २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे, चोरट्याने त्याच ठिकाणी असलेल्या अन्य दागिन्यांना हातही लावला नाही. दुसरे म्हणजे, नायर यांच्याकडे येत्या ३० डिसेंबरला मुलीचा लग्नसोहळा आहे. त्यामुळे त्यांची लगीनघाई सुरू असताना ही घटना घडल्याने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

ठळक मुद्देबजाजनगरातील घटना :लग्नाच्या आनंदावर विरजण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलीच्या लग्नासाठी घरात आणून ठेवलेली सव्वाचार लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. शंकरनगर पार्कजवळ राहणारे गोपीनाथन शिवशंकर नायर (वय ५८) यांच्या निवासस्थानी २२ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे, चोरट्याने त्याच ठिकाणी असलेल्या अन्य दागिन्यांना हातही लावला नाही. दुसरे म्हणजे, नायर यांच्याकडे येत्या ३० डिसेंबरला मुलीचा लग्नसोहळा आहे. त्यामुळे त्यांची लगीनघाई सुरू असताना ही घटना घडल्याने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे.नायर यांची कन्सल्टन्सी आहे. त्यांचे दोन माळ्यांचे निवासस्थान असून, ते वरच्या माळ्यावर राहतात. ३० डिसेंबरला त्यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून त्यांनी दागिने व अन्य चीजवस्तूंची खरेदी तसेच जुळवाजुळव चालवली आहे. २२ नोव्हेंबरला त्यांनी बँकेच्या लॉकरमधून सोन्याचे दागिने काढून घरी आणले. रात्री १० वाजता त्यांनी ते दागिने आपल्या शयनकक्षातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले. त्याला कुलूपही लावले. १६ डिसेंबरला त्यांना राणी कोठीमधील एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी सहपरिवार जायचे होते. त्यामुळे त्यांनी कपाटातील दागिने काढण्यासाठी ड्रॉवरचे कुलूप उघडले. अनेक दागिन्यांचे पाऊच, डबे व्यवस्थित होते. मात्र, ४ लाख, २० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या त्यात दिसल्या नाही. त्यांनी परिवारातील सदस्यांना याबाबत विचारणा केली. मात्र, कुणीच त्याबद्दल काही सांगितले नाही. तीन दिवस विचार केल्यानंतर त्यांनी १९ डिसेंबरला अंबाझरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चौकशी केली. नायर यांचे निवासस्थान बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी ‘झीरो क्राईमी’नुसार नोंद करून प्रकरण चौकशीसाठी रविवारी बजाजनगर पोलिसांना पाठवले.ज्याचा धाक होता, तेच झाले !नायर यांनी चोरीच्या धाकाने खबरदारीचा उपाय म्हणून दागिने, रोकड आणि मौल्यवान चीजवस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्या होत्या. लग्नसमारंभाच्या निमित्ताने त्यांनी दागिने बँकेच्या लॉकरमधून घरी आणले आणि घरातूनच ते चोरीला गेले. विशेष म्हणजे, कोणताही कडी-कोंडा किंवा कुलूप तोडण्यात आले नाही. ड्रॉवरच्या चावीचा वापर करूनच ते दागिने चोरले गेले. दुसरे म्हणजे, त्याच ठिकाणी असलेले अन्य दागिने जसेच्या तसे ठेवून नेमक्या सोन्याच्या बांगड्या चोरण्यात आल्या. त्यामुळे नायर यांच्या निवासस्थानी संपर्क असलेल्यांपैकीच कुणी तरी ही चोरी केली असावी, असा संशय आहे.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर