शांतिनगरात धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:09 AM2021-09-26T04:09:06+5:302021-09-26T04:09:06+5:30

नागपूर : अनेकदा चोरटे घरमालक घरी नसले की घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, दागिने पळवितात. परंतु घरात सर्वजण झोपलेले ...

Brave burglary in Shantinagar | शांतिनगरात धाडसी घरफोडी

शांतिनगरात धाडसी घरफोडी

Next

नागपूर : अनेकदा चोरटे घरमालक घरी नसले की घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, दागिने पळवितात. परंतु घरात सर्वजण झोपलेले असताना घरफोडी करून ८.७७ लाखाचा मुद्देमाल पळविल्याची घटना शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली आहे.

उज्ज्वला पंकज राऊत-पाटील (४०) रा. व्हीएचबी कॉलनी यांनी पीयूसी सेंटर बंद करून दुकानातील रोख ८.५५ लाख खर्ड्याच्या बॉक्समध्ये पॅक केली. हा बॉक्स त्यांनी घरातील लोखंडी आलमारीत ठेवला होता. त्या आपल्या परिवारासह झोपल्या असताना त्यांना आलमारी उघडण्याचा आवाज आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता आलमारीतील रोख रक्कम आणि चष्म्याच्या डब्यातील सोन्याचे दागिने असा एकूण ८.७७ लाखाचा मुद्देमाल चोरी झाल्याचे समजले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

..............

Web Title: Brave burglary in Shantinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.