आत्महत्या प्रकरणात प्रियकर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:13 IST2021-09-09T04:13:08+5:302021-09-09T04:13:08+5:30
कामठी : पतीशी फारकत घेतल्यानंतर विवाहितेचे दुसऱ्या तरुणाशी सूत जुळले. त्याने तीन महिन्यांनंतर लग्न करण्याची सूचना केली. मात्र, ताे ...

आत्महत्या प्रकरणात प्रियकर अटकेत
कामठी : पतीशी फारकत घेतल्यानंतर विवाहितेचे दुसऱ्या तरुणाशी सूत जुळले. त्याने तीन महिन्यांनंतर लग्न करण्याची सूचना केली. मात्र, ताे निघून गेल्यानंतर तिने छताच्या पंख्याला गळफास लावत आत्महत्या केली. दरम्यान, पाेलिसांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नाेंदवून तिच्या प्रियकरास बुधवारी अटक केली.
उमेर उद्दीन फैजुद्दिन अन्सारी (३१, रा. कामगारनगर, नवीन कामठी) असे अटकेतील आराेपी प्रियकराचे नाव आहे. शाहीन बानो मोहम्मद शकीम (२६, रा. लकडगंज, तेलीपुरा, कामठी) असे मृत महिलेचे नाव असून, तिने काही महिन्यांपूर्वी पतीकडून साेडचिठ्ठी घेतली हाेती. त्यानंतर, तिचे उमेर उद्दीन फैजुद्दिन अन्सारी या विवाहित तरुणाशी प्रेमसंबंध जुळले हाेते. ती लकडगंज, तेलीपुरा, कामठी येथे किरायाच्या घरात राहायची. दाेघेही साेमवारी रात्री भेटले हाेते. त्याच वेळी तिने उमेरकडे लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला हाेता. यावरून दाेघांमध्ये वाद झाला हाेता. त्यानंतर ताे आपल्या घरी निघून गेला असता तिने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत उमेर उद्दीन फैजुद्दिन अन्सारी याच्या तक्रारीवरून पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला हाेता. दरम्यान, बुधवारी मृत शाहीन बानाे हिची आई बिस्मिल्ला बेगम जियाउद्दिन अन्सारी (५०, रा. ड्रॅगन पॅलेस, नवीन कामठी) यांच्या तक्रारीवरून मृत महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाेंदवून आराेपी उमेरला अटक केली आहे.
याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. ठाणेदार विजय मालचे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास दुय्यम पाेलीस निरीक्षक मंगेश काळे करीत आहेत.