बोर्इंग कंपनीचे बी-७७७ विमान नागपुरात
By Admin | Updated: September 9, 2015 03:08 IST2015-09-09T03:08:19+5:302015-09-09T03:08:19+5:30
मिहानमधील एअर इंडियाच्या ‘एमआरओ’मध्ये दुरुस्ती व देखभालीसाठी मंगळवारी दुपारी दाखल झाले.

बोर्इंग कंपनीचे बी-७७७ विमान नागपुरात
बोर्इंग कंपनीचे बी-७७७ विमान नागपुरात मिहानमधील एअर इंडियाच्या ‘एमआरओ’मध्ये दुरुस्ती व देखभालीसाठी मंगळवारी दुपारी दाखल झाले. विमानाची ३४० जागांची क्षमता आहे. हे विमान बुधवारी सकाळी ७ वाजता ‘एमआरओ’ येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे रवाना होणार आहे. ९ ते १३ सप्टेंबर सलग पाच दिवस हज यात्रेकरूंना नेण्याचे या विमानाचे शेड्यूल आहे. दरदिवशी सकाळी ११.२० वाजता जेद्दाहकडे उड्डाण भरून रात्री १२.५० वाजता नागपुरात येईल. विमानाचे पहिले उड्डाण बुधवारी सकाळी ११.२० वाजता असून हज यात्रेकरूंना जेद्दाह येथे नेणार आहे. .