संविधान दिनी लाेकशाहीला नमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:14+5:302020-11-28T04:07:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाची प्रत राष्ट्राला ...

संविधान दिनी लाेकशाहीला नमन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाची प्रत राष्ट्राला अर्पण केली. त्या निमित्त नागपूर जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांतर्फे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून लोकशाहीला नमन करण्यात आले. संविधानाबद्दल माहिती देण्यासाठी चर्चासत्र, वक्तृत्व स्पर्धा यासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले.
....
लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय
पारशिवनी : तालुक्यातील बाबुळवाडा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य राजश्री उखरे यांच्या हस्ते संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नारायण बावनकुळे, अतुल भोयर, व्यंकटी बोपचे यांनी संविधानाप्रति भावना व्यक्त केल्या. सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
...
महाराष्ट्र अंनिस
कोराडी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोराडी शाखेतर्फे येथील संघदीप बुद्धविहाराच्या प्रांगणात विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र अंनिस पथनाट्य, पोवाडा, भारुड, व्याख्याने, चर्चासत्रे चालता-बोलता संविधान यांचे आयोजन करून संविधानाची जागृती करीत असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणेश सोरमारे होते. यावेळी गौरव आळणे, अमित सरोदे, सभापती पंकज ढोणे, रवींद्र चौरे, देवानंद वाठोरे, शुभेलाल खोब्रागडे, चेतन खोरगडे, अश्विन भड, अनिकेत नारनवरे, वैभव तिजारे, सिद्धांत वाघमारे, प्रशांत मारबते, रितेश खडसे, प्रफुल्ल आखरे, नारायण चापले, अमोल मेश्राम, सागर लोधी, प्रिया वाघदरे, रोशन डोंगरे, चंदा नारनवरे, पायल वाघमारे, पंकज राऊत, शुभम राऊत, गणेश करारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बबन गायकवाड यांनी केले तर गणेश कांबळे यांनी आभार मानले.