बोर्इंग ‘एमआरओ’चे तीन महिन्यांनी उद्घाटन

By Admin | Updated: April 24, 2015 02:17 IST2015-04-24T02:17:41+5:302015-04-24T02:17:41+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते एमआरओ दरम्यान बोर्इंगने मिहानमध्ये बांधलेल्या २.६५ कि़मी. लांबीच्या ....

Bourcing 'MRO' Inaugurated In Three Months | बोर्इंग ‘एमआरओ’चे तीन महिन्यांनी उद्घाटन

बोर्इंग ‘एमआरओ’चे तीन महिन्यांनी उद्घाटन

मोरेश्वर मानापुरे नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते एमआरओ दरम्यान बोर्इंगने मिहानमध्ये बांधलेल्या २.६५ कि़मी. लांबीच्या टॅक्सी-वे ची यशस्वी चाचणी एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.ने (एआयईएसएल) बुधवारी यशस्वीरीत्या घेतली. या चाचणीचा अहवाल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीआय) पाठविण्यात आला असून टॅक्सी-वेचे औपचारिक उद्घाटन तीन महिन्यांनी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
डीजीसीआयचा परवाना आवश्यक
डीजीसीआयची चमू एमआरओ आणि टॅक्सी-वेची पाहणी करण्यासाठी लवकरच नागपुरात येणार आहे. एमआरओ सुरू करण्यासाठी अडचणी आहेत की नाहीत, यासंदर्भातील अहवाल ही चमू पंतप्रधान कार्यालयात देतील. डीजीसीआयचा परवाना मिळाल्यानंतर एमआरओचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. सध्या उद्घाटन केव्हा होणार, हे निश्चित नाही, पण या प्रक्रियेसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर बोर्इंगची भारतातील विमानांची दुरुस्ती व देखभाल या केंद्रात करण्यात येणार आहे.
डीजीसीआयच्या काही नियमांची पूर्तता केल्यानंतरच विदेशी विमानांना या केंद्रात दुरुस्तीसाठी परवानगी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Bourcing 'MRO' Inaugurated In Three Months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.