शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये काँग्रेस नेत्यांना पुष्पगुच्छ, तर लसीकरणात भाजप कार्यकर्त्यांची चमकोगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून वैद्यकीय मदतीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून वैद्यकीय मदतीसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. मात्र दुसरीकडे राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांकडून बेजबाबदारपणाचे प्रदर्शन होताना दिसून येत आहे. मेडिकलच्या स्थितीचा आढावा घ्यायला गेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चक्क अधिष्ठात्यांकडून सत्कार स्वीकारताना दिसून आले. तर दुसरीकडे लसीकरणाच्या एका केंद्रावर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ला धाब्यावर बसवत ‘फोटोसेशन’ केले. ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ होत असलेल्या या दोन्ही छायाचित्रांमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मेडिकलच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासमवेत शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे हेदेखील होते. दोन्ही नेते आमदार असल्यामुळे मेडिकलच्या अधिष्ठात्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विशेष म्हणजे नेत्यांनी त्याचा स्वीकारदेखील केला. यावेळी अधिष्ठात्यांच्या दालनात काँग्रेसचे आणखी चार पदाधिकारीदेखील होते. एकीकडे मेडिकलमध्ये स्थिती गंभीर झाली आहे. रुग्णांना बेड मिळत नसून व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, इंजेक्शनची कमतरता आहे. मेडिकलमध्ये कमी मनुष्यबळात काम सुरू आहे. अशा स्थितीत वैद्यकीय क्षेत्राशी काहीच संबंध नसलेल्या पदाधिकाऱ्यांसह तेथे जाण्याची काय गरज होती व सध्याच्या स्थितीचे काही सोयरसुतक नाही का, असा सवाल ‘सोशल मीडिया’वर उपस्थित करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाना पटोले यांनी अगोदर पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला होता.

लसीकरण केंद्रातून भाजपचा प्रचार?

भाजपतर्फेदेखील अशाच पद्धतीचा कारभार सुरू आहे. नागपूर मनपातर्फे सीताबर्डी येथील बुटी दवाखान्यात सहा दिवसांअगोदर कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. याची पाहणी करण्यासाठी धरमपेठ झोनचे सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, प्रसन्ना पातुरकर यांनी दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत परिसरातील भाजप व भाजयुमो कार्यकर्तेदेखील होते. या लोकांना आपण लसीकरण केंद्रात आहोत याचेदेखील भान राहिले नाही आणि हिरणवार यांच्यासह सीताबर्डीतील कार्यकर्ता असलेल्या अमित पाठक व इतर काही जणांनी चक्क ‘फोटोसेशन’ केले. लसीकरण केंद्रावर इतक्या लोकांना परवानगी कशी काय देण्यात आली आणि लसीकरणाच्या माध्यमातून भाजपचा प्रचार सुरू होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.