शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

दोघांना जन्मठेप

By admin | Updated: July 2, 2016 03:14 IST

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कावरापेठ चौकात तीन वर्षांपूर्वी मोटरसायकलच्या धक्क्यातून झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश...

मोटरसायकलच्या धक्क्यातून हत्या : कावरापेठ चौकात घडला होता थरारनागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कावरापेठ चौकात तीन वर्षांपूर्वी मोटरसायकलच्या धक्क्यातून झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांच्या न्यायालयाने एकूण दहा आरोपींपैकी दोन जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तीन आरोपींना एक वर्ष सश्रम कारावास, प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दोन जणांची चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका केली आणि तीन जणांना सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडले. सचिन हरिनारायण पावनकर रा. लालगंज आणि मनीष देवनाथ सदावर्ते रा.मेंहदीबाग रोड रामनगर, अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. महेश मोतीलाल पराते, गौरव सूर्यकांत ढवळे दोन्ही रा. लालगंज आणि दीपक गुलाबराव ढोबळे रा. बस्तरवारी, अशी एक वर्ष कारावासाची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. अंकुश दिलीप बिनेकर आणि नेहाल गुलाब चौधरी दोन्ही रा. बस्तरवारी या दोन आरोपींना चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सोडण्यात आले. तर मोहम्मद तौकीर मोहम्मद फारुखी रा. दहीबाजार, मंगेश ओप्रकाश बिनेकर रा. मानेवाडा आणि प्रभाकर सुरेश बिनेकर रा. बस्तरवारी , अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुमित चोखीलाल श्रीवास (२२), असे मृताचे नाव होते. तो टिमकीच्या बाबा रामसुमेरनगर येथील रहिवासी होता. खुनाची घटना २१ मे २०१३ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली होती. खटल्याची पार्श्वभूमी अशी, घटनेच्या दिवशी सुमित श्रीवास हा आपला मित्र गणेश सिन्हा याच्यासोबत मोटरसायकलवर कावरापेठ रेल्वे क्रॉसिंगकडून येत होता. रेल्वे फाटक बंद असल्याने ते थांबले होते. त्यावेळी सुमितच्या मोटरसायकलचा धक्का एका आरोपीच्या मोटरसायकलला लागला होता. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सुमित हा रेल्वे फाटकातून निसटून कावरापेठ चौकाकडे पळून जाऊ लागला होता. त्याच वेळी काही आरोपींनी तीन मोटरसायकलींवर स्वार होऊन त्याचा पाठलाग सुरू केला होता. त्यांनी कावरापेठ चौकात सुमितला घेराबंदी करून हातबुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले होते. त्याच वेळी सचिन पावनकर आणि मोहम्मद तौकीर हे मारोती कारने आले होते. त्यांनी कारमधून उतरून सुमितच्या पोटावर चाकूने सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले होते. (प्रतिनिधी)१४ साक्षीदार तपासलेकावरापेठ चौकातच सुमितचा भाऊ राकेश याची पानटपरी होती. आपल्या भावावर हल्ला होताना पाहून तो बचावासाठी गजानन उईके याला सोबत घेऊन धावला असता आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. सुमितला उपचारार्थ खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला होता. राकेश श्रीवास याच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून एकेक करीत सर्व दहा आरोपींना अटक केली होती. पोलीस निरीक्षक धनंजय सोनवणे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले होते. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे , फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. विलास सेलोकर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड. एस. बी. चौरसिया, अ‍ॅड. सी. आर. ठाकूर, अ‍ॅड. राम मासुरके यांनी काम पाहिले.