अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2015 02:52 IST2015-10-25T02:52:19+5:302015-10-25T02:52:19+5:30

टिप्पर आणि मॅक्सच्या चालकाने निष्काळजीपणे वाहने चालवून एकमेकांना जोरदार धडक मारल्यामुळे मॅक्सचालकासह दोघांचा मृत्यू झाला.

Both of them died in an accident | अपघातात दोघांचा मृत्यू

अपघातात दोघांचा मृत्यू

टिप्पर आणि मॅक्सची टक्कर : दोघे गंभीर जखमी
नागपूर : टिप्पर आणि मॅक्सच्या चालकाने निष्काळजीपणे वाहने चालवून एकमेकांना जोरदार धडक मारल्यामुळे मॅक्सचालकासह दोघांचा मृत्यू झाला. दिघोरी उमरेड मार्गावर शनिवारी दुपारी १२.४५ वाजता हा भीषण अपघात घडला. सोमेश्वर महादेव सेलोकार आणि रफीक शेख गुलाब शेख अशी मृतांची नावे आहेत.
टिप्पर (एमएच ४०/ वाय ९४९५)चा चालक आणि मॅक्स (एमएच ३१/ एपी ८७६९) चा चालक सोमेश्वर महादेव सेलोकार या दोघांनीही भरधाव वेगात वाहने चालवून पांडव कॉलेजजवळ समोरासमोर एकमेकांना धडक दिली. त्यामुळे मॅक्सचालक सेलोकर तसेच जीपमध्ये बसलेला प्रवासी रफिक शेख गुलाब शेख हे दोघे गंभीर जखमी झाले तर, अन्य दोन प्रवाशांनाही दुखापत झाल्याचे कळते. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच हुडकेश्वरचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी संतप्त जमावाला शांत केले. जखमींना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सेलोकरला दुपारी २ वाजता तर रफिक शेखला सायंकाळी ६.१५ वाजता मृत घोषित केले.(प्रतिनिधी)

Web Title: Both of them died in an accident