शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातात विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:33 IST

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा करुण अंत झाला तर एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. अवघ्या पाच तासाच्या अंतराने हे दोन जीवघेणे अपघात घडले.

ठळक मुद्देएक जण गंभीर : वाहनचालकांचा निष्काळजीपणा : मानकापुरात झाले अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा करुण अंत झाला तर एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. अवघ्या पाच तासाच्या अंतराने हे दोन जीवघेणे अपघात घडले.बारावीचा विद्यार्थी असलेला पारितोष प्रदीप कोरे (वय १८, रा. प्रकाशनगर, गोधनी) हा त्याच्या एका मित्रासोबत शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास शिकवणी वर्गाला जात होता. मानकापूरच्या शफीनगर पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रक (जीजे १८/ एव्ही ९८१६) च्या चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पारितोष जागीच गतप्राण झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने धाव घेतल्याचे पाहून आरोपी ट्रकचालकाने खाली उडी मारून पळ काढला. जमावाने दगडफेक करून ट्रकला आगही लावण्याचा प्रयत्न केला. तर जमावातील काही जणांनी जखमी पारितोषच्या मित्राला खासगी इस्पितळात दाखल केले. विशेष म्हणजे, दुपारी झालेल्या या अपघातातील जखमी विद्यार्थ्याचे नाव रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. मानकापूर पोलिसांनी ट्रक जप्त केला. वाहनचालक फरार आहे.या अपघातापूर्वी मानकापूर ठाण्याच्या हद्दीत सकाळी ११.१५ च्या सुमारास असाच एक जीवघेणा अपघात झाला. मानकापूर ते जरीपटका पुलाच्या मार्गावर भरधाव वाहनाने (एमएच ३१/ एफए २१८१) च्या चालकाने जोरदार धडक मारल्याने प्रतीक्षा जुगेश खोब्रागडे (वय २२) या महिलेचा करुण अंत झाला. प्रतीक्षा आणि तिचा पती जुगेश विजय खोब्रागडे (वय २८) हे दाम्पत्य मूळचे मुंडीपार सडक, ता. साकोली (जि. भंडारा) येथील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने ते नागपुरात आले. ते इंदोरा परिसरात राहत होते. शनिवारी सकाळी ११.१५ वाजता प्रतीक्षा तिच्या सायकलने जात असताना आरोपी वाहनचालक प्रशांतकुमार विजयप्रसाद (रा. खारकपुरा परासिया, बलिया, उत्तर प्रदेश) याने निष्काळजीपणे वाहन चालवून प्रतीक्षाचा बळी घेतला. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मानकापूर पोलिसांनी आरोपी वाहनचालकाला ताब्यात घेतले.जखमी वृद्धाचा मृत्यूहिंगण्याच्या पेंढरी देवळी शिवारात २६ जानेवारीला दुपारी इंडिका कारचालकाने धडक दिल्यामुळे विजय शंकरराव धुमाळ (वय ६८, रा. एस.टी. कॉलनी, वडगाव रोड यवतमाळ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. त्यांचा २१ फेब्रुवारीला मृत्यू झाला. मंगला विजयराव धुमाळ (वय ६३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी कारचालकाचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात