शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेल फ्लशिंगमुळे आठ कोटीची बचत : जि.प. अध्यक्षांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 00:45 IST

ZP President टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदल्या जातात. परंतु नागपूर जिल्हा परिषदेने गेल्या दोन वर्षापासून नवीन बोअरवेलची कामे न करता जुन्याच व बंद पडलेल्या बोअरवेलला पुनरुज्जीवित करण्याचा कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शासनाचे टंचाईच्या कामावर खर्च होणारे सात ते आठ कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देभूजल पातळी वाढणार

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदल्या जातात. परंतु नागपूर जिल्हा परिषदेने गेल्या दोन वर्षापासून नवीन बोअरवेलची कामे न करता जुन्याच व बंद पडलेल्या बोअरवेलला पुनरुज्जीवित करण्याचा कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शासनाचे टंचाईच्या कामावर खर्च होणारे सात ते आठ कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.

बर्वे म्हणाल्या की, शासनामार्फत बोअरवेल उभारणी व त्याची देखभाल-दुरुस्ती कार्यक्रम १९७२ पासून राबविण्यात येत आहे. परंतु कालांतराने काही बोअरवेल पूर्ण कार्यक्षम राहत नाही. त्यामध्ये पाण्याची आवक क्षमता कमी होणे, गाळ जमा होणे, झाडांची मुळे, दगड, माती, वाळू इत्यादीमुळे बोअरवेल बुजणे त्याचप्रमाणे ढासळल्यामुळे खोली कमी होणे, या कारणांमुळे अनेक बोअरवेल बंद अवस्थेत होत्या. तर ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर असून उपयोगात नसल्याने वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने नवीन बोअरवेल मंजुरीसाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे बऱ्याच गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती. निधीच्या कमतरतेमुळे व इतर तांत्रिक कारणांमुळे दरवर्षी नवीन बोअरवेल खोदणे अडचणीचे होते. त्यावर सीएसआर फंडातून बोअरवेल फ्लशिंग या अभिनव उपक्रमाची सुरुवात सावनेर विधानसभा क्षेत्रांतर्गत कळमेश्वर तालुक्यात ६० गावांमध्ये करण्यात आली. त्यामुळे त्या गावातील बंद असलेल्या बोअरवेल फ्लशिंग करून अत्यंत कमी खर्चात पुन्हा सुरू करण्यात आल्या. विशेष म्हणजे नवीन बोअरवेल खोदण्याकरिता जवळपास दीड लाखाचा खर्च अपेक्षित असून, फ्लशिंगसाठी जास्तीतजास्त अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शासनाची मोठी बचत झाली. पत्रपरिषदेला सभापती भारती पाटील, तापेश्वर वैद्य, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे उपस्थित होते.

 यंदा ११०० बंद पडलेल्या बोअरवेलचे होणार फ्लशिंग

यंदा टंचाई आराखड्यात १०० नवीन बोअरवेल खोदण्याची मंजुरी आहे. परंतु, त्यापेक्षा कमी खोदल्या जाणार असून, ११०० बोअरवेलचे फ्लशिंग करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरMediaमाध्यमे