सीमा विस्तार व मतदार वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:15 IST2021-09-02T04:15:04+5:302021-09-02T04:15:04+5:30
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २०२२ च्या निवडणुकीसाठी वार्ड रचना करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सदस्यांची १५१ संख्या ...

सीमा विस्तार व मतदार वाढणार
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २०२२ च्या निवडणुकीसाठी वार्ड रचना करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सदस्यांची १५१ संख्या कायम ठेवून काही वाॅर्डांचा सीमाविस्तार व मतदार संख्येची मर्यादा वाढवण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
...
असे आहेत सीमाभागातील प्रभाग
शहरालगतचा भाग प्रामुख्याने प्रभाग २ , प्रभाग ३, प्रभाग ४, प्रभाग ११, प्रभाग १२, प्रभाग २५, प्रभाग २६, प्रभाग २८, प्रभाग २९, प्रभाग ३४, प्रभाग ३५, प्रभाग ३८ आदी प्रभागात आहे. या भागातील वॉर्डाचा विस्तार मोठा राहण्याची शक्यता आहे.
...
१० टक्के कमी-अधिक मतदार
मागील निवडणुकीतील २४ लाख, ४७ हजार, ४९४ लाख लोकसंख्या गृहीत धरता एका वॉर्डात १६ लाख मतदार असायला हवेत. परंतु मागील १० वर्षांत शहरातील लोकसंख्या ५ लाखांनी वाढली आहे. याचा विचार १८ ते १९ लाख मतदार राहतील. परंतु वॉर्ड रचना करताना गरजेनुसार १० टक्के कमी अधिक मतदार ठेवावे लागल्यास काही वॉर्डातील मतदारांची संख्या १९ लाखांहून अधिक तर काहींची १७ लाखांच्या खाली राहील.