शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रात दोन हजार कार आणि पाच हजार दुचाकींचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 11:18 IST

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मे महिन्यापासूनच चारचाकी गाड्यांना मागणी वाढू लागली असून सणांच्या दिवसांत अचानक वाढ झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात २ हजार चारचाकी, तर ५ हजारांपेक्षा जास्त दुचाकी गाड्यांचे बुकिंग झाले आहे.

ठळक मुद्देदसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची गाडी घरी नेण्याची तयारी

नागपूर : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढत असूनही दुसरीकडे नागरिकांचा वाहनखरेदीचा ओघही वाढतच आहे. यावर्षी जिल्ह्यात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर २ हजार कार आणि ५ हजारांच्यावर बाईक्सचे बुकिंग झाले असल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 

पेट्रोल आणि डिझेलची शंभरी पार होऊनसुद्धा चारचाकी आलिशान गाड्यांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत तिपटीने वाढली आहे. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दोन हजार चारचाकी, तर पाच हजारांपेक्षा जास्त दुचाकी गाड्यांचे बुकिंग झाले आहे. बुकिंग जास्त झाले तरीही चारचाकी गाड्यांमध्ये लागणाऱ्या सेमी-कंडक्टर चीपमुळे ग्राहकांना डिलिव्हरी देण्यास अडचण येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी दसऱ्याला विविध शोरूममधून एक हजारापेक्षा जास्त चारचाकी गाड्यांची विक्री झाली होती. यंदा हा आकडा दोन हजारांपेक्षा जास्त जाईल, असा विक्रेत्यांना विश्वास आहे. यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मे महिन्यापासूनच चारचाकी गाड्यांना मागणी वाढू लागली. त्यातच सणांच्या दिवसांत अचानक वाढ झाली आहे. नागपुरात जवळपास १४ पेक्षा जास्त कंपन्यांचे विक्रेते आहेत. मारुती, ह्युंडई, टाटा, मर्सिडीज, महिन्द्र, निसान, फोक्सवॅगन, फोर्ड, एमजे, किया, टोयोटा, जीप, रेनॉल्ट, स्कोडा अशा नामवंत आलिशान गाड्यांचे शोरूम आहेत. या सर्व शोरूममध्ये लोकांनी आवडत्या गाडीचे बुकिंग केले आहे.

निर्मिती प्रकल्पात उत्पादन अर्ध्यावर

सेमी-कंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स चीपचा तुटवडा जाणवत असल्यामुळे सर्व चारचाकी गाड्यांच्या निर्मिती प्रकल्पात गाड्यांचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. त्यामुळे आता बुकिंग केलेल्या गाड्या डिसेंबरपर्यंत ग्राहकांना मिळतील, असे विक्रेत्यांनी सांगितले. लोक थांबण्यास तयार आहेत. सध्या कंपन्यांकडून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. मलेशिया, तैवान, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि चीन येथून सेमी-कंडक्टर चीपचा पुरवठा कमी असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.

कोरोनानंतर गाड्यांच्या विक्रीत वाढ

कोरोनामुळे गाड्यांची विक्री वाढेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांना नव्हती; पण अचानक मागणी वाढल्याने विक्रेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पण गाड्या वेळेत देण्यात विक्रेत्यांना अडचण येत आहेत. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक गाड्यांचेही बुकिंग वाढले आहे. सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स चीपमुळे गाड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

ग्राहकांची सर्वच गाड्यांना पसंती...

बाजारात चार लाखांपासून ७० ते ८० लाखांपर्यंत गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असले तरीही ग्राहकांची सर्वाधिक पसंती याच गाड्यांना आहे. कोरोनानंतर लोकल प्रवास करण्यासाठी प्रत्येक घरात छोटी चारचाकी कार असावी, याकडे लोकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. चारचाकीसोबतच मालवाहतूक गाड्या, दुचाकी गाड्यांची मागणी वाढली आहे.

दुचाकी गाड्या उपलब्ध

पुढे महाविद्यालय सुरू होणार असल्याने अनेक पालक बाईक आणि स्कूटरेट खरेदीसाठी पुढे येत आहेत. सर्वच विक्रेत्यांकडे दुचाकी उपलब्ध आहेत. नागपूर जिल्ह्यात पाच हजारांपेक्षा जास्त दुचाकीचे बुकिंग झाले आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून लोक गाड्या घरी नेत आहेत. अनेकजण दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुचाकी घरी नेण्याच्या तयारीत आहेत.

ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह

कोरोनानंतर दुचाकी व चारचाकी गाड्यांची विक्री वाढली, ही बाब खरी आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चारचाकीची डिलिव्हरी देण्यास अडचण येत आहे; पण दुचाकी सहज उपलब्ध आहे. अनेक शोरूममध्ये दुचाकीवर सवलत देण्यात येत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :carकार