शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हायहोल्टेज मॅचमध्ये विराटने बुकींचा हजारो कोटींचा डाव उलटवला

By नरेश डोंगरे | Updated: June 30, 2024 00:20 IST

सट्टा बाजारात वारंवार 'कलर' : शेवटच्या चेंडूपर्यंत सटोडे संभ्रमात : सट्टा बाजारात मिळाला होता रोहितला 'गेमचेंजर'चा मान : बुकींच्या हातातून हजारो कोटी सट्टेबाजांच्या खिशात वळते

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : टी-२० च्या विश्वचषकासाठी खेळल्या गेलेल्या थरारक अंतिम सामन्यावर हजारो कोटींचा सट्टा लागला असताना बुकी बाजारात वारंवार कलर (बदल) आले. शेवटच्या ३ चेंडूपर्यंत कोण जिंकणार, हे अस्पष्टच राहिल्यामुळे सट्टा बाजार चांगलाच संभ्रमात सापडला होता. दरम्यान, हजारो कोटींचा सट्टा खेळणाऱ्या 'क्रिकेट बुकींना' आजच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही चांगलेच तोंडघशी पाडले.

भारतातील सट्टेबाजांसाठी सर्वाधिक भरवशाचा म्हणून चर्चेत असलेला राजस्थानमधील फलोदी सट्टा बाजार, मध्य प्रदेशातील इंदोर सट्टा बाजार आणि महाराष्ट्रातील नागपूरच्या सट्टाबाजाराने टी-२० चा विश्वचषक टीम इंडियाच जिंकेल, असे भाकित केले होते. त्याचमुळे टीम इंडियाची ७० टक्के तर साऊथ आफ्रिकेची ३० टक्केच विश्वचषक जिंकण्याची शक्यता आहे, असे सांगून त्या संबंधाने बुकींनी वेगवेगळे डाव (रेट) दिले होते. बुकींचे भाकित खरे ठरले. टीम इंडिया जिंकली. मात्र, हा सामना कमालीचा रोमहर्षक ठरला. आफ्रिकन खेळाडू बॅटिंग करीत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये जिंकण्या-हरण्याची पोजिशन बदलत होती. (या घडामोडीला सट्टा बाजार 'मॅचमध्ये कलर' येणे असे म्हणतो) हा बदल अखेरच्या तीन चेंडूपर्यंत तसाच होता. वारंवार कलर येत असल्याने हजारो कोटींची लगवाडी-खयवाडी सुरू होती अन् संभ्रमही वाढतच होता.

गेमचेंजरचा अंदाजही चुकला

एकीकडे अशा थरारक पद्धतीच्या सामन्यामुळे सट्टाबाजार हैरान झाला असतानाच विराट कोहलीनेही बुकींची विकेट घेतली. ती अशी की, आतापर्यंतच्या सामन्यातील विराटची निराशाजनक खेळी आणि रोहितची उत्सावर्धक कामगिरी बघून बुकीबाजाराने विराटच्या तुलनेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला बुकी बाजाराने 'गेमचेंजर' घोषित केले होते. अर्थात् व्यक्तीगतरित्या भारतीय खेळाडूंवर सर्वाधिक रकमेचा सट्टा रोहित शर्मावर लावला गेला होता. मात्र, सट्टा बाजाराचा अंदाज चुकीचा ठरवत विराटने आज चांगली खेळी करून बुकींना तोंडघशी पाडले. एवढेच नव्हे तर बुकींवर, बुकींचाच हजारो कोटींचा डाव उलटवला.

पाऊसानेही दाखविला रंग, सट्टा बाजारात नोटांचाच पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार बारबडोसमध्ये आज २९ जुनला पाऊस येण्याची शक्यता ७८ टक्के होती. विशेष म्हणजे, दिवसभर आभाळ भरून होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच्या काही वेळेपर्यंत ८७ टक्क्यांवर पोहचली होती. अशात ३० जूनला हा अंतिम सामना होणार होता. मात्र, याही दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ६१ टक्के वर्तविण्यात आली होती. मात्र, तो अंदाजदेखिल खोटा ठरला. सामन्यादरम्यान पाऊस आला नाही. मात्र, शेकडो कोटींचा सट्टा लागल्यामुळे सट्टा बाजारात अक्षरश: नोटांचा पाऊस पडला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी