रेल्वे स्टेशनवर बॉम्ब
By Admin | Updated: January 24, 2016 02:48 IST2016-01-24T02:48:24+5:302016-01-24T02:48:24+5:30
नागपूर रेल्वे स्टेशनवर शनिवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कमसम रेस्टॉरंटसमोर बेवारस पडून असलेल्या एका बॅगने रेल्वे सुरक्षा एजन्सीसह प्रवाशांना घाबरवून सोडले.

रेल्वे स्टेशनवर बॉम्ब
मॉकड्रील : प्रवासी घाबरले
नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनवर शनिवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कमसम रेस्टॉरंटसमोर बेवारस पडून असलेल्या एका बॅगने रेल्वे सुरक्षा एजन्सीसह प्रवाशांना घाबरवून सोडले.
घटनेची माहिती होताच तातडीने रेल्वे पोलिसांनी परिसराला घेरले आणि बॅगची तपासणी केली. बॅगेत कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्याचवेळी ही मॉकड्रील असल्याचेही उघडकीस आले.
पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गणतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयएसआयएसने दिलेल्या धमकीमुळे नागपूर रेल्वे स्टेशनला हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवारी मॉकड्रील घेण्यात आली.
याअंतर्गत आरपीएफ ठाण्यातून कंट्रोल रुमला सूचना देण्यात आली की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वर कमसम रेस्टॉरंटजवळ एक बॅग संशयास्पद अवस्थेत दिसून येत आहे ही सूचना मिळताच आरपीएफ-जीआरपी जवान, डॉग स्क्वॉड चमू प्लॅटफॉर्मवर तातडीने दाखल झाली. बॅगची तपासणी केल्यावर त्यात कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
एकूणच या घटनेमुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवासी घाबरले होते. परंतु ही मॉकड्रील असल्याचे नंतर त्यांनाही समजले (प्रतिनिधी)