शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मंत्रालयातील बोगस नोकर भरती रॅकेटची चौकशी होणार; ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 06:08 IST

लाखो रुपये उकळले, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार: देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर:मंत्रालयातील शिपायाने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस नोकर  भरती रॅकेट चालवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले. ‘लोकमत’ने हे रॅकेट उघडकीस आणले होते. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करत याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली.

 मंत्रालयातील एका शिपायाने आपण सचिवपदावर कार्यरत असल्याचे सांगत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून १२ बेरोजगार तरुणांना फसवल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. वेगवेगळी कारणे पुढे करून या बेरोजगार तरुणांकडून ७४ लाख रुपये उकळण्यात आले. 

विशेष म्हणजे, या सर्वांची मुलाखत मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात घेण्यात आली. ही बाब गभीर असून, याप्रकरणी शासनाने कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली.

मंत्रालयातच घेतली बोगस मुलाखत 

- मालाड येथे राहणाऱ्या एका तरुणाची ओळख महेंद्र सकपाळ नावाच्या व्यक्तीसोबत झाली. हा तरुण स्वतःसाठी आणि त्याच्या दोन भावंडांसाठी नोकरीच्या शोधात असल्याचे सकपाळ यांना समजले. त्यांनी आपल्या परिचयातील नितीन साठे हे सामान्य प्रशासन विभागात सचिवपदावर कार्यरत असून, त्यांना सांगून नोकरीसाठी प्रयत्न करता येईल, असे या तरुणाला सांगितले. 

- या तरुणाने सुरुवातीला नऊ लाख रुपये सकपाळ यांना दिले. छायाचित्र, आधार कार्ड तसेच इतर सर्व कागदपत्रे या तिघांनी सकपाळ यांच्याकडे दिली. 

- त्यानंतर या तरुणांची मंत्रालयात मुलाखत घेण्यात आली. जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. हे बोगस नोकरभरती रॅकेट असल्याने ‘लोकमत’ने समोर आणले होते.

- ‘लोकमत’ने २० डिसेंबरच्या अंकात याबाबतचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केला होता. यातील सर्व मुद्द्यांचा उहापोह सभागृहातील चर्चेत झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMantralayaमंत्रालयLokmat Impactलोकमत इम्पॅक्टLokmatलोकमत