शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तोतया पोलिसांनी महिलेला फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:12 IST

नंदनवन ठाण्यांतर्गत दुचाकीने जात असलेल्या महिलेला दोन तोतया पोलिसांनी गाडी तपासण्याच्या बहाण्याने लुटले. दुचाकीसह ४५ हजारांची रोख लंपास केली, ही घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी रंजना रमेश नगराळे (४०) रा. नंदनवन झोपडपट्टी यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देगाडी तपासण्याच्या बहाण्याने लुटले : दुचाकीसह रोकड लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नंदनवन ठाण्यांतर्गत दुचाकीने जात असलेल्या महिलेला दोन तोतया पोलिसांनी गाडी तपासण्याच्या बहाण्याने लुटले. दुचाकीसह ४५ हजारांची रोख लंपास केली, ही घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी रंजना रमेश नगराळे (४०) रा. नंदनवन झोपडपट्टी यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २.३० च्या दरम्यान नगराळे या त्यांच्या एमएच-३१/ईबी-४७५८ क्रमांकाच्या दुचाकीने आईला भेटण्यास निघाल्या होत्या. नंदनवन परिसरातील दिघोरी पुलाजवळील रिंगरोडवर २५ ते ३० वयोगटातील दोन भामट्यांनी नगराळे यांना रस्त्यात रोखले. त्यांनी आपण पोलीस असून तुमच्या गाडीचे कागदपत्र दाखवा, अशी बतावणी केली. गाडीचे कागदपत्र तपासण्याच्या बहाण्याने त्या तोतयांनी नजर चुकवून नगराळे यांच्या गाडीच्या डिक्कीत असलेली ४५ हजारांची रोकड व त्यांची दुचाकी घेऊन पोबारा केला. नगराळे यांनी आरडाओरड केली, मात्र दोन्ही चोरटे पसार झाले. यानंतर नगराळे यांनी नंदनवन ठाणे गाठून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर