शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
11
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
12
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
13
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
14
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
15
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
16
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
18
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
19
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
20
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

बोईंगने स्क्रॅप म्हटलेले विमान आता लागले उडायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:24 IST

Boeing Nagpur News उत्पादक कंपनी बोईंगने १९८५ मध्ये विमानाला स्क्रॅप करण्यास सांगितले होते.  आता एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (एआयईएसएल) उडण्याकरिता सक्षम बनविले आहे.

ठळक मुद्दे 'एआयईएसएल'चा 'मेक इन इंडिया'मध्ये पुढाकारउत्पादक कंपनीने दिला होता नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवसीम कुरैशीनागपूर : १९६० च्या दशकात हवाई वाहतुकीत आघाडीवर असणारे बोईंग-७०७ ने व्यावसायिकरीत्या उड्डाण भरल्यानंतर ३० वर्षांपूर्वीच ताफ्यातून बाहेर काढण्यात आले. भारतात एअर इंडियाच्या ताफ्यात या विमानाचा प्रवेश १९६५ मध्ये झाला होता. उत्पादक कंपनी बोईंगने १९८५ मध्ये विमानाला स्क्रॅप करण्यास सांगितले होते.  आता एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (एआयईएसएल) उडण्याकरिता सक्षम बनविले आहे.गेल्या वर्षी या विमानाला पूर्णत: नवीन आणि उड्डाणासाठी सक्षम बनविण्यासाठी एआयईएसएलने बोईंगकडून इंजिनिअरिंग टीम मागितली होती. कंपनीने टीम देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आव्हान म्हणून एआयईएसएलने विमान तयार केले आहे. त्याचे मॅन्युअलही एआयईएसएलने बनविले आहे. ५० प्रेशर सायकल अथवा सामान्यरीत्या त्याच्या उड्डाणानंतर मेन्टेन करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणांनी याच्या उपयोगाच्या विषयातील माहितीचा खुलासा करण्यात आलेला नाही. हे विमान जानेवारी २०२० पासून निरंतर उड्डाण करीत आहे.विमान जुने असल्याने सुटेभाग उपलब्ध नव्हते, शिवाय उत्पादकाची तांत्रिक मदतही नव्हती. मुंबई एमआरओमध्ये दोन बोईंग ७०७ विमान उभे होते. त्यातील एकाची स्थिती खराब होती. त्याचे पार्ट दुसऱ्या विमानाला तयार करण्यासाठी उपयोगात आणण्यात आले. त्याला पेंटिंग करून नवीन बनविण्यात आले. नागपूर एमआरओचे कार्यरत चार अभियंते ७०७ च्या रिस्ट्रक्चरिंग करणाऱ्या १० अभियंत्यांमध्ये सहभागी होते.

विशेष दक्षतेने केले कामएआयईएसएल बोईंग-७०७ व्यतिरिक्त आऊटडेटेड होत असलेल्या ७३७ आणि ७४७ विमानांच्या मेन्टेनन्समध्ये उत्तम काम करीत आहे. याकरिता विशेष दक्षतेवर लक्ष देण्यात येत आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगशी जुळलेली अनेक आव्हाने असतात.- एच. आर. जगन्नाथ, सीईओ, एआयईएसएल.

टॅग्स :airplaneविमान