बॉडीगार्ड्स टीमने जपले रक्ताचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:39+5:302021-07-19T04:06:39+5:30

- रॉयल किंग बॉडीगार्ड सिक्युरिटीचे रक्तदान शिबिर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तसंकलन अभियानात ...

The bodyguards team maintained a blood relationship | बॉडीगार्ड्स टीमने जपले रक्ताचे नाते

बॉडीगार्ड्स टीमने जपले रक्ताचे नाते

- रॉयल किंग बॉडीगार्ड सिक्युरिटीचे रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तसंकलन अभियानात सहभागी होत खाजगी सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या बॉडीगार्ड्सच्या टीमने सामाजिक दायित्त्वाचे निर्वहन करत रक्ताचे नाते जपले. यावेळी मोठ्या संख्येने बॉडीगार्ड्ससह नागरिकांनीही रक्तदान अभियानात सहभाग नोंदवला.

रॉयल किंग बॉडीगार्ड सिक्युरिटीच्या (शानू खान) वतीने पागल खाना शरिफ दरगाह येथे लोकमतच्या आवाहनाला साद देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन पार पडले. इतरांच्या सुरक्षेत सदैव तत्पर असणाऱ्या बॉडीगार्ड्सने रक्तदानासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला आणि युवा वर्गाला प्रेरणात्मक होता. यावेळी ललित तिवारी, शानू खान, सुमित सावरकर, आतिश द्रविडकर, रितिक परवार, अक्षय तळवेकर, कार्तिक परवार, बब्बू बारापात्रे, शाहिद खान, अलकेश चिमुटे, वसीम कुरेशी, अमीत अंबादे, सरदाताज मोहम्मद, हर्षल दिवे, हरिश बनसलवार, जय रामटेके, संजय रामटेके, कपिल तिरपुडे, निखिल वानखेडे, रमेश वानखेडे, मंगेश वानखेडे, अनिकेत मुळे, शेखर रंभाळ, आसीफ खान, पौसाज खान उपस्थित होते.

.................

Web Title: The bodyguards team maintained a blood relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.