वेणा नदीत मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:48+5:302021-07-18T04:07:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : परिसरातून वाहणाऱ्या वेणा नदीच्या पात्रात गुरुवारी (दि. १५) दुपारी मृतदेह आढळून आला. पाेलिसांनी संपूर्ण ...

वेणा नदीत मृतदेह आढळला
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : परिसरातून वाहणाऱ्या वेणा नदीच्या पात्रात गुरुवारी (दि. १५) दुपारी मृतदेह आढळून आला. पाेलिसांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंत्यसंस्काराच्या पूर्वी शनिवारी (दि. १७) सकाळी त्या मृतदेहाची ओळख पटली. त्याने आत्महत्या केली की त्याचा बुडून मृत्यू झाला, याबाबत संभ्रम कायम आहे.
दीनदयाल लालजी पाचे (३८) असे मृताचे नाव असून, ता. मूळचा गाेंदिया जिल्ह्यातील रहिवासी असला तरी काही वर्षापासून राजीवनगर, हिंगणा राेड, वानाडाेंगरी, ता. हिंगणा येथे किरायाने राहायचा पेंटिंगची कामे करून उदरनिर्वाह करायचा. पत्नी दीक्षा दाेन्ही मुलींना घेऊन बुधवारी (दि. १४) सकाळी माहेरी गेली हाेती. त्यानंतर दीनदयाल घराबाहेर पडला. ती बुधवारी सायंकाळी परत आली. परंतु, दीनदयाल रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नाही.
दरम्यान, दीक्षाने त्याचा शाेध घेतला. मात्र, तिला यश आले नाही. गुरुवारी सकाळी वेणा नदीच्या पात्रात आढळून आलेला अनाेळखी मृतदेह पाेलिसांनी ताब्यात घेत नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला.
...
दाेन दिवसानंतर ओळख पटली
वेणा नदीत आढळून आलेला मृतदेह दीनदयालचा आहे, याबाबत दीक्षाला काहीही माहिती नव्हते. पती घरी आला नाही म्हणून ती शनिवारी सकाळी हिंगणा पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यासाठी गेली. तिने दीनदयालचे वर्णन सांगताच ठाणेदार सारीन दुर्गे यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी तिला पाेलिसांसाेबत मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविले. मेडिकलमध्ये पाेहाेचताच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गंगाबाई घाट येथे नेल्याचे सांगण्यात आल्याने पाेलिसांनी तिला लगेच गंगाबाई घाट येथे नेले. मृतदेह दीनदयालचा असल्याचे तिने सांगताच ओळख पटली. त्यानंतर मृतदेह तिच्या सुपूर्द करण्यात आला.