बंद कारखान्यात मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:12 IST2021-08-27T04:12:54+5:302021-08-27T04:12:54+5:30

हिंगणा : डाेंगरगाव शिवारात बंद असलेल्या कारखान्यात गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ ...

The body was found in a closed factory | बंद कारखान्यात मृतदेह आढळला

बंद कारखान्यात मृतदेह आढळला

हिंगणा : डाेंगरगाव शिवारात बंद असलेल्या कारखान्यात गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

मुकेश जयराम माटे (५०, रा. समता नगर, नारी रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. डाेंगरगाव शिवारात नागपूर-वर्धा मार्गालगत चमडा नामक कंपनी आहे. ती मागील काही वर्षापासून बंद असल्याने तिथे कुणाचाही वावर नाही. या कंपनीच्या आवारातून उग्र वास येत असल्याने नागरिकांनी बारकाईने तपासणी केली. त्यावेळी आवारातील शेडखाली कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे त्यांना आढळून आले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रावरून मृताची ओळख पटल्याची माहिती पाेलिसांनी दिली. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र कळू शकले नाही. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: The body was found in a closed factory