बसस्थानकात आढळला अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:02+5:302021-09-25T04:09:02+5:30
काटाेल : शहरातील बसस्थानकातील फलाट क्रमांक ७ वर शुक्रवारी (दि. २४) सकाळी अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

बसस्थानकात आढळला अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह
काटाेल : शहरातील बसस्थानकातील फलाट क्रमांक ७ वर शुक्रवारी (दि. २४) सकाळी अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही.
काटाेल डेपाेचे वाहतूक नियंत्रक दिगांबर देवघरे शुक्रवारी सकाळी कर्तव्यावर आले असता, त्यांना फलाट क्रमांंक ७ मधील बाकावर एक व्यक्ती झाेपली असल्याचे आढळून आले. त्यांना त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांसाेबतच पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. त्याची ओळख पटली नसून, मृत्यूचे कारणही कळू शकले नाही. त्याचे वय ७० वर्षाच्या आसपास असून, उंची पाच फूट तीन इंच आहे, अशी माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.