लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या एका तरुणाला तसेच त्याला सदनिका उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या मित्राला नंदनवन पोलिसांनी अटक केली. या दोघांवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुभम भीमराव कान्हारकर (वय १९) असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव आहे. तो आराधनानगरात राहतो. १२ वीत शिकणा ऱ्यां एका युवतीसोबत (वय १६) शुभमचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध आहे. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शुभमने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीला १४ मे च्या सायंकाळी ५.३० वाजता यश राजेश गडेकर (वय १९) याच्या सदनिकेत नेले. घरी कुणी नसल्यामुळे यशने शुभमला ही सदनिका उपलब्ध करून दिली. शुभमने तेथे तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हे सर्व आपापल्या घरी निघून गेले. त्या दिवसांपासून युवतीला वेदना होऊ लागल्या. भीतीपोटी तिने उपचार करण्याचे टाळले. त्यामुळे वेदना वाढत गेल्या. गुरुवारी हा प्रकार लक्षात आल्यामुळे आईवडिलांनी तिला खोदून खोदून विचारले. तेव्हा शुभमसोबत लग्न करणार असून, त्याच्यासोबत तीन आठवड्यांपूर्वी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याची माहिती युवतीने दिली. ती ऐकून पालकांनी तिला सरळ नंदनवन ठाण्यात नेले. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आरोपी शुभम कान्हारकरला ताब्यात घेतले. त्याला या गुन्ह्यात मदत करणारा त्याचा मित्र यश यालाही पोलिसांनी अटक केली. हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.
नागपुरात अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:54 IST
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या एका तरुणाला तसेच त्याला सदनिका उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या मित्राला नंदनवन पोलिसांनी अटक केली. या दोघांवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपुरात अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध
ठळक मुद्देबलात्काराच्या आरोपात प्रियकर गजाआड : सदनिका देणारा मित्रही गजाआड