बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:14 IST2021-02-23T04:14:15+5:302021-02-23T04:14:15+5:30
हिवराबाजार : मागील ४० दिवसांपासून बेपत्ता असलेली व्यक्ती सर्वत्र शाेध घेऊन कुठेही गवसली नाही. त्यातच त्या व्यक्तीचा सिंदेवाणी ते ...

बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला
हिवराबाजार : मागील ४० दिवसांपासून बेपत्ता असलेली व्यक्ती सर्वत्र शाेध घेऊन कुठेही गवसली नाही. त्यातच त्या व्यक्तीचा सिंदेवाणी ते कट्टादरम्यानच्या नाल्यात रविवारी दुपारी अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
चिंधू कवडू नान्हे (५५, रा. हिवराबाजार, ता. रामटेक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. चिंधू हे मासेमारी करून उदरनिर्वाह करायचे. त्यांनी सिंदेवाणी व कट्टा शिवारातील तलाव मासेमारीसाठी ठेक्याने घेतला हाेता. ते ११ जानेवारी राेत्री रात्री ७ वाजेच्या सुमारास तळ्यावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले हाेते. त्यानंतर घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घ्यायला सुरुवात केली. कुठेही आढळून न आल्याने शेवटी कुटुंबीयांनी १२ जानेवारी राेजी ते बेपत्ता असल्याची देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या तक्रार नाेंदविली हाेती. दरम्यान, रविवारी (दि. २१) सिंदेवाणी-कट्टादरम्यानच्या नाल्यात एकाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत हाेता. ताे मृतदेह चिंधू नान्हे यांचा असल्याचेही नंतर स्पष्ट झाले. मृतदेहापासून उत्तरेस ५० मीटरवर एक मोटारसायकल (क्र. एमएच-४०/एएच-९६४०) आढळून आली. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. याप्रकरणी देवलापार पाेेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड करीत आहेत.