बेपत्ता शेतमजुराचा नाल्यात मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:13 IST2021-09-17T04:13:01+5:302021-09-17T04:13:01+5:30
काेंढाळी : तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतमजुराचा गावालगतच्या नाल्यात मृतदेह आढळला. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खुर्सापार येथे ...

बेपत्ता शेतमजुराचा नाल्यात मृतदेह आढळला
काेंढाळी : तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या शेतमजुराचा गावालगतच्या नाल्यात मृतदेह आढळला. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खुर्सापार येथे गुरुवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
दिवाकर बाळकृष्ण पराची (४५, रा. खुर्सापार, ता. काटाेल) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. मृत दिवाकर हा शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत हाेता. साेमवारी (दि.१३) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ताे घरून गेल्यापासून बेपत्ता हाेता. याबाबत त्याचे वडील बाळकृष्ण महादेव पराची (८५) यांनी काेंढाळी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गावालगतच्या एका नाल्यात दिवाकरचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच काेंढाळी पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. उत्तरीय तपासणी अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण कळू शकेल, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी दिली. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास सहायक फाैजदार दिलीप इंगळे करीत आहेत.