शेतमजुराचा नदीत मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:08 IST2021-09-13T04:08:30+5:302021-09-13T04:08:30+5:30

भिवापूर : शेतमालकाचे बैल चारण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा दुसऱ्या दिवशी नदीत मृतदेह आढळला. नदीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक ...

The body of a farm laborer was found in the river | शेतमजुराचा नदीत मृतदेह आढळला

शेतमजुराचा नदीत मृतदेह आढळला

भिवापूर : शेतमालकाचे बैल चारण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा दुसऱ्या दिवशी नदीत मृतदेह आढळला. नदीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील झिलबाेडी येथे रविवारी (दि. १२) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

दशरथ बिसन पाटील (४५, रा. झिलबाेडी) असे मृताचे नाव आहे. दशरथ शनिवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास शेतमालकाचे बैल चारण्यासाठी जंगलात गेला हाेता. मात्र रात्र हाेऊनही ताे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शाेध घेत पाेलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, रविवारी सकाळच्या सुमारास गावालगतच्या नदीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह नदीबाहेर काढला. या प्रकरणी भिवापूर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, ठाणेदार महेश भाेरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास भगवानदास यादव करीत आहेत.

Web Title: The body of a farm laborer was found in the river