जंगलात गुराख्याचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST2021-07-16T04:07:52+5:302021-07-16T04:07:52+5:30

काेंढाळी : गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तराेडा ...

The body of a cowherd was found in the forest | जंगलात गुराख्याचा मृतदेह आढळला

जंगलात गुराख्याचा मृतदेह आढळला

काेंढाळी : गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याचा जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तराेडा शिवारात बुधवारी (दि.१४) रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

लक्ष्मण गणेश साेलंकी (२५, रा. तराेडा) असे मृत गुराख्याचे नाव आहे. लक्ष्मण हा काेंढाळी येथील शेतकरी संजय खाेडणकर यांच्याकडे गुरे चारण्यासाठी कामाला हाेता. बुधवारी नेहमीप्रमाणे ताे गुरे घेऊन जंगलात गेला. सायंकाळी गुरे परत आली मात्र लक्ष्मण परत आला नाही. त्याचा लहान भाऊ श्याम साेलंकी व कुटुंबीयांनी लक्ष्मणचा शाेध सुरू केला. दरम्यान, तराेडा शिवारातील तलावालगत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे तराेडा गावात शाेककळा पसरली आहे.

घटनेची महिती मिळताच काेंढाळीचे प्रभारी ठाणेदार राहुल बाेंद्रे, सहायक पाेलीस निरीक्षक प्रभू ठाकरे, उपनिरीक्षक राम ढगे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृताच्या डाव्या कानातून रक्त निघत असल्याचे दिसून आले. दगडावर पडून दुखापत झाली की आणखी कशामुळे हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: The body of a cowherd was found in the forest