तलावात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST2021-07-03T04:07:30+5:302021-07-03T04:07:30+5:30

---- गांधीसागर तलावात मृतदेह आढळला नागपूर : नटराज टॉकिजमागे राहणारे राजू पुरुषोत्तम खळतकर (वय ४०) यांचा मृतदेह गांधीसागर तलावाच्या ...

Bodies found in lake | तलावात आढळला मृतदेह

तलावात आढळला मृतदेह

----

गांधीसागर तलावात मृतदेह आढळला

नागपूर : नटराज टॉकिजमागे राहणारे राजू पुरुषोत्तम खळतकर (वय ४०) यांचा मृतदेह गांधीसागर तलावाच्या पाण्यात आढळून आला. शुक्रवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर सतीश नरसिंगराव पाटोळे (वय ४६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

जखमी महिलेचा मृत्यू

नागपूर : मुलाच्या दुचाकीवर बसून उमरेडला लग्नासाठी जाणारी महिला २० जूनला सकाळी दुचाकीवरून खाली पडून जखमी झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. लता श्रीकृष्ण घरत (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. २० जूनला सकाळी उमरेडला लग्नासाठी त्या मुलगा रोहन श्रीकृष्ण घरत (वय ३१) याच्यासोबत दुचाकीवर बसून जात असताना विहीरगावजवळ हा अपघात घडला होता. हुडकेश्वर पोलिसांनी या अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

-----

भिंत अंगावर पडून मजुराचा करुण अंत

नागपूर - भिंत तोडत असताना अंगावर पडल्याने लक्ष्मण सुखारी प्रसाद (वय २५, रा. राजीवनगर, हिंगणा) या मजुराचा करुण अंत झाला. २८ जूनला दुपारी २.३० वाजता जरीपटक्यात ही घटना घडली होती.

----

रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

नागपूर : रेल्वेची धडक बसल्याने संदीप उर्फ छोटू सुभाष वाघमारे (वय ३५, रा. बाराखोली इंदोरा) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शिल्पा सुभाष वाघमारे (वय ६०) यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

-----

Web Title: Bodies found in lake