शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

सरकारी जाळ्यात निळी चिमणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

अखेर ट्विटरची निळी चिमणी केंद्र सरकारच्या जाळ्यात अडकलीच. गुगल, फेसबुक, व्हॉटसॲप, इन्स्टाग्राम व युट्यूब या अन्य सोशल मीडिया कंपन्यांनी ...

अखेर ट्विटरची निळी चिमणी केंद्र सरकारच्या जाळ्यात अडकलीच. गुगल, फेसबुक, व्हॉटसॲप, इन्स्टाग्राम व युट्यूब या अन्य सोशल मीडिया कंपन्यांनी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना मान्य केल्या. त्यात टाकलेल्या अटींनुसार, नोडल ऑफिसर, तक्रार निवारण अधिकारी, अनुपालन अधिकाऱ्यांची जवळपास ठरलेल्या मुदतीत नियुक्ती केली. सरकारशी पंगा टाळला. ट्विटरने मात्र काहीतरी तांत्रिक सबबी शोधून चालढकल केली. प्रकरण अगदीच गळ्याशी आल्याचे पाहून काहीतरी जुजबी बदल केले व तसे कळविताना आम्ही सरकारच्या सगळ्या सूचनांचे पालन करीत आहोत, असे भासविण्याचा प्रयत्न केला. पण, सरकारला ते मान्य नाही. आधी वेळकाढूपणा व नंतर जुजबी अंमलबजावणी यामुळे सरकारने पावले उचलली. समाजमाध्यम म्हणून ट्विटरला तिऱ्हाईत प्लॅटफॉर्म या नात्याने असलेले कायदेशीर संरक्षण काढून घेण्याची कारवाई सरकारने केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे ७९ वे कलम सोशल मीडिया कंपन्यांना एक वेगळे कायदेशीर संरक्षण देते. त्यानुसार या माध्यमांवर टाकलेल्या मजकुराची जबाबदारी कंपनीची नव्हे तर संबंधित व्यक्तीची असते. कंपनीला अशा मजकुराचे प्रकाशक मानले जात नाही. हे संरक्षण हटविण्यात आल्यामुळे यापुढे ट्विटरवर टाकलेले कोणतेही ट्विट किंवा पोस्टची कायदेशीर जबाबदारी त्या व्यक्तीसाेबतच ट्विटर कंपनीचीही राहील. वादग्रस्त, प्रक्षोभक ट्विटसाठी कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकेल. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील मुस्लीम व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात तसा गुन्हा कालच दाखल झाला. त्या घटनेत काही युवक त्या व्यक्तीला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काहींनी ते युवक मारहाण करताना जय श्रीराम घोषणा देण्यास सांगत असल्याचा दावा करण्यात आला. गाझियाबाद पोलिसांनी मात्र या घटनेला कोणताही धार्मिक कंगोरा नसल्याचा, ताबीज खरेदीत फसवणूक झाल्याने ते युवक मारहाण करीत असल्याचा दावा केला व दोन्ही धर्मांमधील काही युवकांना अटक केल्याची माहितीही दिली. या प्रकरणात धार्मिक द्वेष वाढविणारे ट्विट केल्याबद्दल काही पत्रकार व ट्विटरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय कायदा, तसेच माहिती-तंत्रज्ञान व दळणवळणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी ट्विटरवर हल्ला चढविताना केलेल्या लागोपाठच्या ट्विटमध्ये या घटनेचाच थेट संदर्भ दिला. जगातील इतर देश व भारत देशाचा आकार व लोकसंख्येचा मोठा फरक आहे. एखाद्या फेक न्यूजची ठिणगी आग लावू शकते, असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत. यावरून सरकार विरुद्ध ट्विटर या संघर्षाची, तसेच ट्विटरच्या भारतातील पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट व्हावी. यासोबतच फारशी चर्चा होत नसलेल्या आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना ट्विटरला करावा लागू शकतो. ट्विटर ही कलम ७९ नुसार कायदेशीर संरक्षण असलेली विदेशी कंपनी असल्याने तिला माध्यमांमधील परकी गुंतवणुकीची कमाल मर्यादा लागू नाही. एकदा हे संरक्षण हटले, की ती स्वतंत्र माध्यम कंपनी होईल आणि मग कमाल २६ टक्के परकी गुंतवणुकीचा नियम लागू होईल. त्या स्थितीत भारतात ट्विटर चालवायचे असेल तर उरलेल्या ७४ टक्क्यांसाठी भारतीय मालक शोधावा लागेल.

केंद्र सरकार व ट्विटर यांच्यातील या संघर्षाला राजकीय संदर्भ अधिक आहेत व परिणामही राजकीयच असतील. अशा माध्यमांचाच वापर करून भारतीय जनता पक्ष २०१४ मध्ये केंद्रात सत्तेवर आला. देशातील बहुसंख्य राज्येही जिंकली. पण, सोशल मीडिया वापरण्याचे ते कौशल्य नंतरच्या काही वर्षांमध्ये विरोधी पक्षांनीही आत्मसात केले. आता तर तृणमूल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांसारखे एकेका राज्यातच प्रभावी असलेल्या पक्षांचे सोशल मीडिया सेल शक्तिमान भाजपला टक्कर देताना आपण पाहतो. उत्तर प्रदेश, पंजाब वगैरे राज्यांची निवडणूक तोंडावर आहे. उत्तर प्रदेश किंवा अन्य कोणतेही राज्य आणि एकूणच संपूर्ण देशातील कोरोना महामारी हाताळण्याच्या मुद्यावर मुख्य प्रवाहातील माध्यमे फारशी आक्रमक नाहीत. केंद्र सरकारवरील टीकेचे रणांगण खऱ्या अर्थाने सोशल मीडिया हेच आहे. अशावेळी येनकेन प्रकारेण ही माध्यमे नियंत्रणात राहतील, यावर सरकारचा भर असेलच. पण, खरा प्रश्न भारतातील टीकेचा नाही. ट्विटरसारख्या कंपन्यांवर अंकुश ठेवताना जगभर जो संदेश जाईल, भारताच्या प्रतिमेवर डाग पडतील, त्याचे काय याचा विचार आज ना उद्या सरकारला करावाच लागणार आहे.

--------------------------------------