शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अवैध दारू विक्रीच्या वादात खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:18 IST

मित्राला चाकू खुपसून जखमी केल्याची घटना अवैध दारू विक्रीच्या वादातून झाल्याची माहिती आहे. खरा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून जखमी आणि आरोपी दोघेही पोलिसांना सूचना न देता घरी परत गेले होते. वस्तीत खळबळ उडाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देवस्तीत सुरू होता अड्डा : आरोपी लपवीत आहे खरा प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राला चाकू खुपसून जखमी केल्याची घटना अवैध दारू विक्रीच्या वादातून झाल्याची माहिती आहे. खरा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून जखमी आणि आरोपी दोघेही पोलिसांना सूचना न देता घरी परत गेले होते. वस्तीत खळबळ उडाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देण्यात आली.गेल्या १९ नोव्हेंबर रोजी रात्री सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील दारोडकर चौकात दारू पिल्यानंतर झालेल्या वादात अमित राजू यादव (२८) रा. कुंभारपुरा याला त्याच्यात वस्तीत राहणारा प्रवीण दिलीप जाधव याने छातीवर चाकूने वार करून जखमी केले होते. घटनेनंतर दोघेही थेट घरी पोहोचले. या घटनेने वस्तीत खळबळ उडाली. अमितचे कुटुंबीय प्रवीणला मारहाण करू लागले. यानंतर प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांनीच जखमी अमितला मेयो रुग्णालयात दाखल केले होते. विचारपूस करताना दोघांनीही आपल्या बयानात १०० रुपयासाठी वाद झाल्याचे सांगितले होते. प्रवीणने दिलेल्या माहितीनुसार अमितने दारू खरेदी करण्यासाठी १०० रुपये दिले होते. दारू पिल्यानंतर अमित पैसे परत मागू लागला. त्यामुळे त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने अमितवर हल्ला केला.परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वादाचे मुख्य कारण अवैध दारू विक्रीचा वाद आहे. अमित आणि प्रवीण लाकडीपूल जवळील कुंभारपुरा येथे राहतात. ते अवैध दारूच्या विक्रीशी जुळलेले आहेत. प्रवीण दारूच्या दुकानात काम करतो. तो अमितच्या मदतीने अवैध दारू जमा करून बंदीच्या दिवशी त्याची विक्री करतो. दारूबंदीच्या दिवशी कुंभारपुरा येथे दारूड्यांची गर्दी असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून अवैध दारूच्या विक्रीवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. घटनेच्या वेळीसुद्धा दोघेही पैशावरूनच एकमेकांशी भांडू लागले. खरा प्रकार उघडकीस येईल, या भीतीने त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही. त्यामुळे ते थेट घरी परत गेले.सूत्रानुसार अमित आणि प्रवीणच्या या धंद्याची माहिती पोलिसांनाही आहे. त्यांच्याकडे पोलिसांचे येणे-जाणे नेहमी असते. सक्तीने विचारपूस केल्यास त्यांना आश्रय देणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचीही नावे समोर येऊ शकतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर