तरुणाचा निर्घृण खून

By Admin | Updated: April 28, 2016 03:00 IST2016-04-28T03:00:04+5:302016-04-28T03:00:04+5:30

जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना कामठीच्या बुनकर कॉलनीतील

The bloodless youth's blood | तरुणाचा निर्घृण खून

तरुणाचा निर्घृण खून

कामठीतील थरार : एकास अटक; पाच फरार
कामठी : जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना कामठीच्या बुनकर कॉलनीतील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील क्रीडांगणावर मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कामठीत काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. या प्रकरणी कामठी पोलिसांनी एकास अटक केली असून पाच जण फरार आहेत.
शमसुद्दीन ऊर्फ समसू सलाउद्दीन पठाण (३५, रा. नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळेजवळ, इस्लाईमपुरा) असे मृताचे नाव आहे. तर अकरममुल्ला, साजीद अख्तर जामील अख्तर अंसारी, साहीद सदू, मेहताब बोकना, शहदाद अंसारी अशी आरोपींची नावे आहेत. शमसुद्दीन याच्याकडून अकरममुल्ला याने महिनाभरापूर्वी पैसे घेतले होते. त्यातूनच त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र त्यांच्यात आपसी समझोता झाल्याने तेव्हा प्रकरण शांत झाले. दुसरीकडे अकरममुल्ला हा शमसुद्दीनला संपविण्याचा डाव आखत होता. अशात शमसुद्दीन हा त्याचा मित्र जफर अब्बास बरकत अली (२८, रा. आजादनगर) याच्यासोबत मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बसस्थानकाजवळच्या रिक्षा स्टॅन्डवर बसला होता.
तेवढ्यात अकरममुल्लाने शमसुद्दीनला फोन करून पैसे परत करायचे आहे, असे सांगून बुनकर कॉलनीतील मैदानात बोलविले. तेथे जाताच आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी शमसुद्दीनवर तलवार, चाकू, भाल्याने हल्ला केला. त्यात तो रक्तबंबाळ होऊन पडला. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपींनी तेथून पळ काढला. याबाबत शमसुद्दीनच्या भावाला माहिती मिळताच तो घटनास्थळी दाखल झाला. मात्र तोपर्यंत शमसुद्दीनचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार उत्तम मुळक, सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हेडकॉन्स्टेबल मनोज चौधरी हे घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.
याप्रकरणी कामठी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, १४७, १४८, १४९ सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. यापैकी साजीद अख्तर जामील अख्तर अंसारी (२९, रा. कामठी) याला अटक केली. उर्वरित पाच आरोपी फरार झाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The bloodless youth's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.