न्यायाधीशांसह ३५ वकिलांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST2021-09-21T04:10:37+5:302021-09-21T04:10:37+5:30
कामठी : तालुका वकील संघाच्यावतीने कामठी शहरातील न्यायालयाच्या आवारात साेमवारी (दि. २०) रक्तदान व राेगनिदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले ...

न्यायाधीशांसह ३५ वकिलांनी केले रक्तदान
कामठी : तालुका वकील संघाच्यावतीने कामठी शहरातील न्यायालयाच्या आवारात साेमवारी (दि. २०) रक्तदान व राेगनिदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात न्यायाधीश एस. एस. गाढवे यांच्या ३५ वकिलांनी रक्तदान केले तर ८५ वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांची आराेग्य तपासणी करण्यात आली.
कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. गाढवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. आर. भोला, डॉ. त्रिदीप गुहा, डॉ. रवींद्र सावरकर, डॉ. कमलेश शर्मा, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुषमा नितनवरे, डॉ. महेश महाजन, डॉ. वसीम अन्सारी, ॲड. संजय राव, ॲड. ए. डी. भिमटे, ॲड. प्रफुल्ल पुडके उपस्थित होते. या शिबिरात नागरिकांचा रक्तदाब, रक्तशर्करा, ईसीजी, सीबीसी, हिमोग्लोबिन, वात, दंत राेग, हृदयरोग, स्त्रीराेग यांसह विविध आजारांची चाचणी व तपासणी करण्यात आली. आयुष्मान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डाॅक्टरांनी सेवा प्रदान केली. यशस्वितेसाठी ॲड. रिना गणवीर, ॲड. मयूर बोरकर, ॲड. अभिषेक नाथ, ॲड. सीमा गजभिये, ॲड. जी. बी. शर्मा, ॲड. एम. एस. शर्मा, ॲड. हर्ष कोठारी, ॲड. एस. एम. कुशवाहा, ॲड. पंकज यादव, ॲड. मानकर, ॲड. हरदास, ॲड. फालेकर, ॲड. भूषण तिजारे, न्यायालय सहायक अधीक्षक एस. एस .माटे, वरिष्ठ लिपिक वाय. डी. मेश्राम, एच. सी. साखरे, लिपिक प्रांजली मांडलेकर, के. आर. गादंगीवार, सचिन गजपुरे, के. जी. तराळे, एम. आर. गोडबोले, एस. खोब्रागडे, आत्राम, पाली यांनी सहकार्य केले.