महाराष्ट्र नाभिक महामंडळासह सामाजिक संस्थांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:06 IST2021-07-19T04:06:32+5:302021-07-19T04:06:32+5:30
नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातंं या उपक्रमांतर्गत लोकमत वृत्तपत्र समूह आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुढाकारात अवधूत फाऊंडेशन, भारतीय व्यायाम ...

महाराष्ट्र नाभिक महामंडळासह सामाजिक संस्थांचे रक्तदान
नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातंं या उपक्रमांतर्गत लोकमत वृत्तपत्र समूह आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुढाकारात अवधूत फाऊंडेशन, भारतीय व्यायाम प्रसारक मंडळ, रेनबो स्पोर्टिंग क्लब, जे.सी.आय. नागपूर रॉयल या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रक्तदान शिबिर पार पडले. तपस्या विद्या मंदिर, मानेवाडा येथे झालेल्या या शिबिरात ३३ जणांनी रक्तदान केले. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने हा उपक्रम झाला.
कुही पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शारदा किनारकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर होते. महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष रवि बेलपत्रे, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. हिरालाल मेश्राम, तपस्या विद्या मंदिरचे संचालक विजय वाटकर, नीरव रेंगे, रमेश चौधरी, सुरेश चौधरी, गोपाल कडूकर प्रमुख पाहुणे होते.
यावेळी पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक महामंडळाचे प्रदेश सरचिटणीस अरुण जमदाडे यांनी केले. रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. हर्षा सोनी, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांचे स्वागत करण्यात आले. संचालन सरचिटणीस डॉ. सतीश फोपसे यांनी तर आभार कार्याध्यक्ष श्याम चौधरी यांनी मानले. यावेळी आनंद आंबोलकर, अमेय वाटकर, आनंद येसेकर, कल्पना तलवारकर, शुभांगी आंबुलकर, शिल्पा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.