आज नऊ ठिकाणी रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:27+5:302021-07-18T04:07:27+5:30
नागपूर : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर सुरू असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ ...

आज नऊ ठिकाणी रक्तदान शिबिर
नागपूर : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर सुरू असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय रक्तसंकलन मोहिमेला विविध संस्था, संघटना, नागरिकांना उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी १८ जुलै रोजी शहर व जिल्ह्यात नऊ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री श्री फाउंडेशन, कोराडी
कोराडी येथे श्री श्री फाउंडेशनच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोराडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या सभागृहात सकाळी ९ ते ५ वाजेदरम्यान होणाऱ्या या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, सरपंच नरेंद्र धानोले, उपसरपंच आशिष राऊत, नगराध्यक्ष राजेश रंगारी, भाजप महादुला शाखाध्यक्ष प्रीतम लोहासारवा, महिला आघाडी अध्यक्ष नंदा तुरक व युवा मोर्चा यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
संवेदना फाउंडेशन, हिंगणा
संवेदना फाउंडेशनच्या वतीने पडोळे मेडिकल स्टोअर्स सभागृह, बालाजीनगर, हिंगणा रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शिबिराला सुरुवात होईल. रक्तदात्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बबनराव पडोळे, युवानेते उमेशसिंग राजपूत यांनी केले आहे.
चिचाळा (पाहमी), भिवापूर
भिवापूर तालुक्यातील चिचाळा (पाहमी) येथे हनुमान मंदिर देवस्थान समाजभवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, प्रहार वाहन चालक-मालक संघटना, मालेवाडा मित्र परिवार, रामनवमी उत्सव समिती, प्रहार संघटना पाहमी, मांगरूळ व बोटेझरी मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला सकाळी ८.३० वाजता सुरुवात होईल. या राष्ट्रीय कार्यात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आवाहन सुधाकर पडोळे, गणेश इंगोले, मिलिंद राऊत, अंकुश मुंगले, जितू कारमोरे, अमोल गंधरे, अमर माटे, समीर पडोळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अवधूत फाउंडेशन, भारतीय व्यायाम प्रसारक मंडळ, रेनबो स्पोर्टिंग क्लब, जेसीआय नागपूर रॉयल या संस्थांच्या वतीने सकाळी ९.३० वाजता तपस्या विद्या मंदिर, उदयनगर चौक, मानेवाडा रिंग रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर असतील तर उद्घाटन नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांच्या हस्ते होईल. यावेळी महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष रवी बेलपत्रे, कुहीचे गटशिक्षणाधिकारी शारदा किनारकर, नागपूर विद्यापीठ अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. हिरालाल मेश्राम, विजय वाटकर, अरुण जमदाडे, निरव रेगे, रमेश चौधरी, सुरेश चौधरी, गोपाल कडूकर, प्रकाश द्रव्येकर, श्याम चौधरी, डॉ. सतीश फोपसे, तानाजी कडवे, आनंद आंबोलकर, अभय वाटकर उपस्थित राहतील.
गजानन महाराज संस्थान, मोहपा
गजानन महाराज संस्थान, मोहपाच्या वतीने संस्थानाच्या सभागृहात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन नगराध्यक्ष शोभा काऊटकर यांच्या हस्ते होईल. यावेळी डॉ. कोवे, नंदिनी देशमुख, आशिष अंजनकर, आशिष रेवतकर, प्रशांत महाजन, मंदार काऊटकर, मंगेश लाडूकर, राहुल येणूरकर, अरुणा डांगोरे उपस्थित राहतील.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वतीने संत गुलाबबाबा सेवाश्रम, नाग रोड, रेशिमबाग येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, संत गुलाबबाबा सेवाश्रमचे अध्यक्ष शेखर आदमने, नाट्य परिषदेचे प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अकादमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने अकादमी हॉलमध्ये सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन स्मारक समितीचे अध्यक्ष भंते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते होईल. यावेळी सचिव डॉ. सुधीर फुलझेले, प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी मेहेरे, डीएसीएसएचे सचिव अरविंद जोशी, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, आनंद फुलझेले उपस्थित राहतील.
रॉयल किंग सिक्युरिटी बॉडी गार्ड
राॅयल किंग सिक्युरिटी बॉडी गार्ड संघटनेच्या वतीने पागलखाना चौक, ताजुद्दीनबाबा दरगाह येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आ. विकास ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत, मंत्री सुनील केदार, शानू खान यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
सुमन विहार सोसायटी, कामठी
सुमन विहार सोसायटी, कामठी
यांच्या वतीने सुमन विहार सोसायटी, कामठी रोड व नाशिकराव तिरपुडे ब्लड सेंटर येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
....