एमआयए हॉलमध्ये रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:53+5:302021-07-17T04:07:53+5:30
नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने (एमआयए) हिंगणा येथील एमआयए हाऊसमध्ये शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबिरात २९ ...

एमआयए हॉलमध्ये रक्तदान शिबिर
नागपूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने (एमआयए) हिंगणा येथील एमआयए हाऊसमध्ये शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबिरात २९ उद्योजक, कर्मचारी आणि कामगारांनी रक्तदान करून मानवतेचा परिचय दिला.
महामारीच्या काळात रक्ताचा तुटवडा असून, जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून रक्त संकलनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेगावकर यांनी केले. शिबिराचे उद्घाटन एमआयएचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर आणि माजी अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष एस.एम. पटवर्धन, कार्यकारी सदस्य प्रवीण पालकर, मनीष सावंत, पी. मोहन, अरविंद कालिया उपस्थित होते. डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिर घेण्यात आले. यावेळी रक्तपेढीचे पीआरओ किरण इंगळे, तंत्रज्ञ कल्याणी हिंगणे, मयुरी मिश्रा, मोना बावनथडे, श्रीपाद मोहरील, जितेंद्र देवगिरीकर आणि असोसिएशनचे बिग्नेश अय्यर, नरेश सहारे, चेतन भगत, शीला ढोरे यांनी परिश्रम घेतले.