कन्हान व बेसूर येथे आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST2021-07-16T04:07:16+5:302021-07-16T04:07:16+5:30

‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय महारक्तदान मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि.१६) डाेणेकर सभागृह कन्हान येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...

Blood donation camp at Kanhan and Besur today | कन्हान व बेसूर येथे आज रक्तदान शिबिर

कन्हान व बेसूर येथे आज रक्तदान शिबिर

‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय महारक्तदान मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि.१६) डाेणेकर सभागृह कन्हान येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोकमत, स्व. गाेपाळराव डाेणेकर जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. सकाळी १० ते ४ वेळेत आयाेजित या शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. उपाध्यक्ष शरद डाेणेकर यांच्या हस्ते करण्यात येईल. या शिबिरात अधिकाधिक संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आयाेजकांनी केले आहे.

.....

शिवसेना शाखा बेसूर

‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत बेसूर (ता. भिवापूर) येथे शुक्रवारी (दि.१६) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. महादेव मंदिर देवस्थान बेसूर येथे सकाळी ९ वाजता शिबिराचे उद्घाटन हाेईल. लाेकमत व शिवसेना शाखा बेसूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खा. कृपाल तुमाने, सरपंच स्नेहा चामट, ठाणेदार महेश भाेरटेकर, सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, भाजप नेते भास्कर येंगळे, शिवसेना तालुका प्रमुख संदीप निंबार्ते, पं. स. सदस्य राहुल मेश्राम, युवक काॅंग्रेसचे महासचिव चेतन पडाेळे, पाेलीस पाटील अमित राऊत, श्रेयस जयस्वाल आदी उपस्थित राहतील. या शिबिरात अधिकाधिक संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन दिलीप बेंभारे, दिनेश सेलाेटे, राेशन भगत, वैभव सहस्रबुद्धे, चेतन आंबुलकर यांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp at Kanhan and Besur today