भिवापूर येथे ६७ रक्तदात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:21+5:302021-07-28T04:08:21+5:30
शिबिराला तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, सहाय्यक निरीक्षक शरद भस्मे, तालुकाप्रमुख संदीप निंबार्ते, ...

भिवापूर येथे ६७ रक्तदात्यांचे रक्तदान
शिबिराला तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, सहाय्यक निरीक्षक शरद भस्मे, तालुकाप्रमुख संदीप निंबार्ते, विजेंद्र हेडाऊ, शिरीष गुप्ता, प्रमोद लांजेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत सर्वत्र रक्ताचा तुटवडा असताना अशा प्रकारे शिबिराचे आयोजन कौतुकास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यशस्वीतेकरिता पिंटू श्रीरामे, धनराज नागपुरे, सूरज श्रीरामे, साहूल ढोणे, सुरेश धुर्वे, शुद्धोधन तांबे, सचिन साखरकर, लक्ष्मण लोडे, पुरुषोत्तम बारापात्रे यांनी परिश्रम घेतले.
270721\1754-img-20210727-wa0052.jpg
रक्तादान शिबीराला उपस्थित ठाणेदार महेश भोरटेकर व मान्यवर