शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फोनवर नेत्यांना अपशब्द बोलणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:56 IST

शिस्तबद्ध पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना पक्षाच्याच नेत्यांबद्दल अपशब्द बोलणे भोवले . पक्षविरोधी कार्य करत असल्याचा ठपका लावत भाजपा शहर उपाध्यक्ष जयहरी सिंह व अभय तिडके यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

ठळक मुद्देभाजपाने उपाध्यक्ष सिंह, तिडके यांना केले निलंबित : भाजपात खळबळ

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्तबद्ध पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना पक्षाच्याच नेत्यांबद्दल अपशब्द बोलणे भोवले . पक्षविरोधी कार्य करत असल्याचा ठपका लावत भाजपा शहर उपाध्यक्ष जयहरी सिंह व अभय तिडके यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.जयहरी सिंह हे संजय गांधी निराधार योजनेचे (पश्चिम नागपूर) अध्यक्ष आहेत. तर तिडके हे नामनिर्देशित सदस्य आहेत. दोघांमध्ये फोनवर झालेल्या चर्चेचा ‘ऑडिओ’ खूप ‘व्हायरल’ झाला आहे. या ‘ऑडिओ’त दोघेही पक्षाच्या मंडळ अध्यक्षांपासून आमदार तसेच पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांबद्दल अपशब्दांचा वापर करत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. हा ‘ऑडिओ’ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला. यासंदर्भात चौकशी केल्यानंतर शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांनी दोघांकडूनही स्पष्टीकरण मागितले होते. समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे कोहळे यांनी दोघांनाही पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. या दोघांनाही संजय गांधी निराधार योजनेतूनदेखील बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.बळीचा बकरा बनविलेजयहरी सिंह यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा विरोध केला आहे. मला बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. मी भाजप किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याबद्दल एकही शब्द बोललेलो नाही, असे त्यांनी सांगितले. तिडके यांनी पटोलेंना मतदान करण्याचा ‘एसएमएस’ पाठविला होता. त्यांनी त्याला नकार दिला. केवळ पिच्छा सुटावा म्हणून ‘ठीक आहे’ असे उत्तर दिले होते. माझ्याकडे सर्व ‘फुटेज’ उपलब्ध आहे. मी भाजपाचा सच्चा कार्यकर्ता आहे व भविष्यातदेखील राहील, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाsuspensionनिलंबन