इंदोऱ्यात जोरदार स्फोट

By Admin | Updated: November 18, 2016 03:00 IST2016-11-18T03:00:37+5:302016-11-18T03:00:37+5:30

जिवंत बारुद बाटलीत भरून रसायन तयार करण्याच्या प्रयत्नात जोरदार स्फोट झाल्यामुळे एक घर जमिनदोस्त झाले.

Blasting in Indore | इंदोऱ्यात जोरदार स्फोट

इंदोऱ्यात जोरदार स्फोट

घर जमिनदोस्त : कथित जादूगार पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : जिवंत बारुद बाटलीत भरून रसायन तयार करण्याच्या प्रयत्नात जोरदार स्फोट झाल्यामुळे एक घर जमिनदोस्त झाले. स्फोटामुळे छत कोसळल्याने प्रयोग करणारा राकेश ऊर्फ पंडित नामक कथित जादूगार जखमी झाला. गुरुवारी रात्री ७.१५ च्या सुमारास जरीपटक्यात ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
इंदोऱ्यातील मायानगरात निता पाटील यांच्या घरी राकेश ऊर्फ पंडित वशिष्ठ तीन वर्षांपासून भाड्याने राहतो. तो स्वत:ला जादूगार, सायंटिस्ट म्हणवून घेतो. नेहमी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या पंडितने गुरुवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास आई बाहेर गेल्याची संधी साधून घरात स्फोटकाचा (बारुद) प्रयोग सुरू केला. अचानक जोरदार स्फोट झाल्याने पंडित राहत असलेले घर जमिनदोस्त झाले. सोबतच बाजूच्या घरातील साहित्य खाली पडले आणि खिडक्यांची तावदाने फुटली. पंडित घरातील पलंगाखाली दबला. दरम्यान, स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी पलंगाखाली दबलेल्या जखमी पंडितला बाहेर काढले.
माहिती कळताच अग्निशमन दल आणि जरीपटका पोलीस घटनास्थळी धावले, काही वेळेनंतर बॉम्बशोधक आणि नाशक पथकही पोहचले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. (प्रतिनिधी)


आणखी होणार स्फोट ?
प्रथमोपचारानंतर जरीपटका पोलिसांनी पंडितला ताब्यात घेतले. त्याची रात्रीपर्यंत चौकशी सुरू होती. आपण ‘स्टेज आर्टिस्ट’असून, गंधक तसेच सल्फरचे मिश्रण करून धूर काढण्याचा प्रयोग करीत असताना हा स्फोट झाल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, आणखी दोन बाटल्या भरून रसायन अशाच पद्धतीने मलब्यात दबले असून, त्याचाही स्फोट होण्याची भीती त्याने व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांचीही काही वेळेसाठी धावपळ उडाली. मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Blasting in Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.